AamirKhan and Kiran Rao have separated  Twitter/ @ANI
मनोरंजन

Aamir Khan: आणि राजा हिंदुस्तानी पुन्हा एकटा

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान(AamirKhan) आणि किरण राव (Kiran Rao) लग्नाच्या 15 वर्षानंतर विभक्त झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (AamirKhan) आणि किरण राव (Kiran Rao) लग्नाच्या 15 वर्षानंतर विभक्त झाले आहेत. अभिनेत्याने एक स्टेटमेंट देत ही माहिती दिली आहे. अभिनेत्याने निवेदनात लिहिले आहे की, "या सुंदर 15 वर्षात आम्ही आमच्या आयुष्यभरचे अनुभव, आनंद आणि एकत्रित घालवलेले काही क्षण एकमेकांसोबत जगले आहे आणि आमचं नात फक्त विश्वास, आदर आणि प्रेमाने मोठं झालं आहे." आता आम्ही आपल्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू करू इच्छितो, यापुढे पती-पत्नी म्हणून नव्हे तर एकमेकांचे सह-पालक आणि कुटुंब म्हणून आम्ही राहू. (Aamir Khan and Kiran Rao have separated after 15 years of marriage)

'आम्ही प्लांड सेपरेशन सुरू केले आहे आणि आता व्यवस्थेचे औपचारिकरण करतांना आम्हाला आता सोयीस्कर वाटत आहे, आम्हा वेगवेगळे राहूनही आमचे आयुष्य एका विस्तृत कुटुंबा प्रमाणे शेअर करत राहू. आम्ही आमचा मुलगा आझाद साठी समर्पित पालक आहोत त्याचे पालनपोषण आम्ही एकत्रित करू. आम्ही चित्रपट, पानी फाउंडेशन आणि आम्हाला आवडत असलेल्या इतर प्रकल्पांवर सोबत काम करत राहू.

आमच्या या नात्यातील निर्णयाबाबत समजून घेतल्याबद्दल आमच्या कुटुंबीय आणि मित्रांचे आभार, ज्यांच्याशिवाय आम्ही हा निर्णय घेवू शकलो नसतो. आम्ही आमच्या हितचिंतकांकडून शुभेच्छा आणि आशीर्वाद घेत आहोत आणि आशा आहे की - आमच्याप्रमाणेच - तुम्ही देखील या घटस्फोटाकडे शेवट म्हणून पाहणार नाही तर एका नवीन प्रवासाची सुरुवात म्हणून पहाल. धन्यवाद. '

किरण आणि आमिरट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने आमिरचे हे विधान सोशल मीडियावर शेअर केले. हे विधान शेअर करून त्यांनी किरण आणि आमिरच्या घटस्फोटाची माहिती दिली.

आमिर आणि किरणची भेट लगान या चित्रपटाच्या सेटवर २००१ मध्ये झाली होती. दोघांनी बर्‍याच प्रकल्पांमध्ये एकत्र काम केले आहे. किरणबरोबरच्या त्याच्या स्टोरीविषयी आमिरने सांगितले होते की, 'लगानच्या शूटिंगदरम्यान मी किरणला भेटलो. ती असिस्टंट डायरेक्टर होती, पण तेव्हा दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल कोणतीच भावना नव्हती. आणि आम्ही मित्रही नव्हतो. त्यानंतर रीनाने घटस्फोट घेतल्यानंतर दोघांची पुन्हा भेट झाली. त्यानंतर आमचे फोनवर बोलणे वाढू लागले. मला किरणशी बोलायला आवडायचं आणि आज मी किरणबरोबर खूप आनंदी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: जमीन हडप प्रकरणात ED ची मोठी कारवाई; संदिप वझरकर यांच्यासह संबंधितांवर धाड

SCROLL FOR NEXT