Phir Na Aisi Raat Aayegi poster Twitter
मनोरंजन

लाल सिंग चड्ढाच्या तिसऱ्या गाण्यात बघायला मिळाली आमिर-करीनाच्या अप्रतिम प्रेमाची झलक

आमिर खान आणि करीना कपूर अभिनीत 'लाल सिंग चड्ढा' या बहुप्रतिक्षित चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक गोमन्तक

आमिर खान आणि करीना कपूर अभिनीत 'लाल सिंग चड्ढा' या (Laal Singh Chaddha Song) बहुप्रतिक्षित चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने चित्रपटाची उत्कंठा वाढवली आहे. या चित्रपटाची दोन गाणी देखील रिलीज करण्यात आली आहेत ज्यांना चांगलीच पसंती मिळाली होती आणि आता 'लाल सिंह चड्ढा' मधील 'फिर ना ऐसी रात आएगी' हे तिसरे गाणे देखील रिलीज करण्यात आले आहे. या ऑडिओ गाण्याला अरिजित सिंगने आपला आवाज दिला आहे. तर या गाण्याचे बोल एका अप्रतिम प्रेमाची झलक दाखवत आहेत. जे प्रेम एकतर्फी आहे. (Phir Na Aisi Raat Aayegi OUT)

लाल सिंग चड्ढा हा हॉलिवूडचा ऑस्कर विजेते चित्रपट फॉरेस्ट गंपचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत करीना कपूर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच साऊथचा अभिनेता नागा चैतन्यही या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट यावर्षी 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'सिक्रेट सुपरस्टार' रिलीज झाल्यानंतर आमिर खान आणि अद्वैत चंदन 'लाल सिंह चड्ढा'साठी पुन्हा एकत्र आले आहेत.

अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाशी टक्कर देणार आहे. या संघर्षासाठी दोन्ही स्टार्स पूर्णपणे तयार आहेत. आणि आपआपल्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

'लाल सिंह चड्ढा' चित्रपटातील हे गाणे रिलीज होताच खूप ऐकले जात आहे. 4 मिनिटे 45 सेकंदाच्या या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहे. अद्वैत चंदन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असताना, अभिनयासोबतच आमिर खानने किरण रावसोबत चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारीही सांभाळली आहे. 2018 मध्ये आमिर 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' या चित्रपटात दिसला होता. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांचे फारसे लक्ष वेधून घेऊ शकला नाही. 4 वर्षांनंतर आमिर खान 'लाल सिंह चड्ढा'मधून पुनरागमन करत आहे, ज्याबद्दल चाहत्यांना खूप उत्सुकता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

SCROLL FOR NEXT