Ronaldo Salman khan viral Video Dainik Gomantak
मनोरंजन

रोनाल्डोने चक्क भाईजानला इग्नोर केलं? व्हिडीओ व्हायरल..पण नेमकं खरं काय, चला पाहुया

जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेला फुटबॉलपटू रोनाल्डो आणि बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

Rahul sadolikar

Ronaldo Salman khan viral Video : आपल्या नेत्रदीपक खेळीने जगाला वेड लावणाऱ्या फूटबॉलपटू रोनाल्डोला कुठल्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. आपल्या अप्रतिम कौशल्याने रोनाल्डोने जगभरातून प्रेम आणि आपुलकी मिळवली आहे. सध्या रोनाल्डो एका व्हिडीओमुळे सोशल मिडीयावर चर्चेत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये रोनाल्डो चक्क बॉलीवूडचा भाईजान सलमान खानला इग्नोर करताना दिसत आहे.

सलमान आणि रोनाल्डो

सलमान खान हे अभिनयाच्या जगात मोठे नाव आहे तर क्रिस्टियानो रोनाल्डोची गणना जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये केली जाते. जेव्हा या दोन महान व्यक्तिमत्त्वांना एकाच छताखाली दिसले तेव्हा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होऊ लागले.

नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याला पाहून काही लोक म्हणाले की, रोनाल्डोने सलमानकडे त्याच प्रकारे दुर्लक्ष केले आहे जसे सलमानने एका कार्यक्रमात विकी कौशलकडे दुर्लक्ष केले होते. पण आम्ही तुम्हाला सांगतो की असे काहीही नाही.

दोन स्टार्स बोलताना दिसले

सलमान आणि रोनाल्डोचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघे एकमेकांशी हसताना आणि बोलताना दिसत आहेत.

सलमान खान सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये होता, जिथे तो एका फुटबॉल इव्हेंटमध्ये गेला होता. फुटबॉल जगताचा सम्राट ख्रिस्तियानो रोनाल्डोही येथे होता. दोघांना एकत्र पाहून चाहत्यांनी आनंदाने उड्या मारल्या.

यूजर्सना विक्कीची आठवण

क्रिस्टियानो रोनाल्डोने सलमान खानकडे दुर्लक्ष केल्याचा हा व्हिडिओ आधी व्हायरल झाला होता. हे पाहून यूजर्सनी सलमानच्या फॅन्सची खिल्ली उडवायला सुरुवात केली. त्यांना त्या प्रसंगाची आठवण येऊ लागली जेव्हा सलमानने विक्कीकडे अशाच एका कार्यक्रमात दुर्लक्ष केले होते.

सलमान आणि रोनाल्डोचा एकत्र फोटो

त्यानंतर लगेचच आणखी एक फोटो समोर आला, ज्याने हे वापरकर्ते अवाक झाले. यामध्ये सलमान आणि रोनाल्डो एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. आता हा फोटोही इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

Bank Loan: 181 कोटींची कर्जे थकित, बँकांकडून पाच वर्षांत घेतली 43,103 कोटींची कर्जे

E Challan Cyber Fraud: बनावट 'ई-चलन', सायबर भामट्यांचा नवा सापळा! वाहतूक विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

SCROLL FOR NEXT