Akasha Chaudhary  Kolhapur
मनोरंजन

विचित्र फॅन...भाग्यलक्ष्मी फेम आकाश चौधरीला रिकामी बॉटल फेकून मारली...व्हिडीओ व्हायरल

टिव्ही सिरीयल भाग्यलक्ष्मी फेम अभिनेता आकाश चौधरीला त्याच्या एका फॅनने रिकामी बॉटल फेकून मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झालेला आहे.

Rahul sadolikar

सेलिब्रिटी आणि त्यांचे फॅन्स यांचं एक गोड नातं असतं. एखाद्या सेलिब्रिटीला त्याचे फॅन्स मोठं करत असतात ;पण बऱ्याचदा गोष्टी बिघडतात आणि चाहते नियंत्रणाबाहेर जातात. असंच झालंय भाग्यलक्ष्मी फेम आकाश चौधरीसोबत. आकाशला मुंबईतल्या त्याच्या काही फॅन्सकडून वाईट वागणूक मिळाली आहे.

सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न

भाग्य लक्ष्मी अभिनेता आकाश चौधरी याच्यावर मुंबईतील काही तरुणांनी हल्ला केला होता, तेही त्याचे चाहते असल्याचे दिसत होते. 

या घटनेचा एक व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे. या घटनेने अनेकांना सेलेब्सच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे कारण हे सर्व पापाराझींसमोर घडले आहे

व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

व्हिडीओच्या ( Akash Chaudhary Viral Video) सुरुवातीला आकाश तरुणांच्या गटासोबत सेल्फी घेताना दिसतो. त्यांच्यासोबत पोज दिल्यानंतर आकाशवर त्यातला एक तरुण बाटली उगारतो.

मुलांच्या अशा वागण्याने आकाश गोंधळून जातो आणि जायला निघतो तेव्हा त्यातला एक तरुण आकाशच्या पाठीवर रिकामी बॉटल फेकून मारतो हा प्रकार लक्षात येताच आकाश त्यांना विचारतो , “तुम्ही काय करत आहात?

यूजर्सच्या प्रतिक्रिया

या विचित्र घटनेवर प्रतिक्रिया देताना, एका यूजरने इंस्टाग्राम पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, “ते सेलिब्रिटी आहेत, सार्वजनिक मालमत्ता नाही. तुझी हिम्मत कशी झाली? आकाशने त्या पोरांना थोबाडीत मारून सगळ्यांना धडा शिकवावा.”  दुसऱ्या एका यूजरने लिहिले या लोकांवर कठोर कारवाई व्हायला हवी”

एका युजरने असेही म्हटले. "जर त्यांनी हल्ला केला तर... ते चाहते नाहीत". दरम्यान, भारती सिंहनेही या घटनेवर प्रतिक्रिया दिली.

आकाश चौधरी

आकाश चौधरी हा टीव्ही शो भाग्य लक्ष्मीमधील (TV Serial Bhagya Laxmi ) भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय, तो डेटिंग इन द डार्कमध्ये देखील दिसला आणि नंतर एमटीव्ही स्प्लिट्सविला 10 मध्ये भाग घेतला होता.

आकाश म्हणाला

अलीकडेच आकाशने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या करिअरबद्दल खुलासा केला. तो म्हणाला, “मी असे शो नाकारले आहेत जिथे मला माझ्या मनाविरुद्ध काही गोष्टी करायला सांगितल्या.

मुल्यांशी तडजोड

या मुलाखतीत आकाश म्हणाला "कधीकधी, मला असे वाटते की मी माझ्या मूल्यांशी तडजोड केली असती तर मी आयुष्यात खूप मोठ्या पदावर पोहोचलो असतो. पण, मला आनंद आहे की मी ज्यावर विश्वास ठेवतो त्यावर मी ठाम आहे.

मी माझ्या आयुष्यात चांगले काम करत आहे. तुम्ही तुमच्या यशाच्या पार्टीला उशीरा पोहोचू शकता, पण तुम्ही चांगल्या स्थितीत असाल तर तुम्ही तिथे पोहोचाल".

Smriti Mandhana Century: स्मृती मानधनाचं ऐतिहासिक 'शतक'! सलग दोन वर्षांत अशी कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला क्रिकेटपटू VIDEO

तोंडावर गोळी घातली नंतर वाहनाखाली चिरडले; गुरांच्या तस्करीला विरोध करणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या

SBI Bank Robbery: कर्नाटकातील एसबीआय बँकेवर मोठा दरोडा! तीन दरोडेखोरांनी लुटले 21 कोटींचे दागिने आणि रोकड, आरोपी पंढरपूरच्या दिशेने पसार

मोपा विमानतळाबद्दल 'भ्रामक' व्हिडिओ बनवणं पडलं महागात! 'यूट्युबर'ला दिल्लीतून अटक, गोवा पोलिसांची मोठी कारवाई

Mahindra Bolero: महिंद्रा बोलेरो निओचा नवा अवतार लवकरच बाजारात; जाणून घ्या बदललेले डिझाइन, फीचर्स आणि संभाव्य किंमत

SCROLL FOR NEXT