Shahrukh Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Shah Rukh Khan : "मी तुझ्याविरुद्ध FIR दाखल करणार"! शाहरुखला फॅनने दिली धमकी...

अभिनेता शाहरुख खानला त्याच्या फॅनने FIR दाखल करण्याची धमकी दिली आहे

Rahul sadolikar

शाहरुख खानच्या पठाणने इतिहास रचला आहे. बाहुबली ते KGF 2 चा रेकॉर्ड मोडला आहे आणि अजून किती रेकॉर्ड मोडणार हाही प्रश्न आता इंडस्ट्रीला पडला आहे . दरम्यान, शाहरुख खानला एका चाहत्याने धमकी दिली आहे. होय, चाहत्याने शाहरुख खोटं बोलत असल्याचं सांगितलं त्यामुळेच त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची धमकी दिली आहे.

शाहरुख खाननेही यावर जाहीर प्रतिक्रिया दिली आहे. काळजी करू नका हा फॅन शाहरूखवरच्या अतिप्रेमामुळे असं म्हणाला आहे. शाहरुखचा हा फॅन असं का म्हणाला? चला जाणुन घेऊया..

अलीकडेच एका चाहत्याचा धमकीच्या स्वरात शाहरुख खानचे कौतुक करण्याचा अनोखा प्रकार पाहायला मिळाला. ही शैली इतकी नवीन होती की अभिनेत्यानेही त्यावर प्रतिक्रिया दिली. 

अख्तर खान नावाच्या युजरने शाहरुख खानचे पठाणचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शाहरुख सिक्स पॅक अॅब्समध्ये दिसत आहे .या फोटोनंतर सोशल मिडीयावर शाहरुख खानकडुन चालवल्या गेलेल्या आस्क एसआरके या सेशनमध्ये कमेंटस येवू लागल्या आणि त्यात एक अतरंगी कमेंट आली आहे. यात एका युजरने शाहरुखवर FIR दाखल करण्याची धमकी दिली आहे

हे फोटो शेअर करताना युजरने म्हटले की, "शाहरुख खान मी तुझ्याविरुद्ध एफआयआर नोंदवणार आहे. तुम्ही खोटे बोलत आहात की तुमचे वय 57 वर्षे आहे. या पोस्टवर प्रतिक्रिया देताना शाहरुख खान म्हणाला की, कृपया या माणसाला असे करू नका. ठीक आहे, मी कबूल करतो की मी 30 वर्षांचा आहे. आता मला सत्य माहित आहे. त्यामुळेच माझ्या आगामी चित्रपटाचे नावही जवान आहे". 

शाहरुख खानच्या सोशल मिडीयावरच्या क्रेजने एक वेगळीच उंची गाठली आहे. पठाण रिलीज झाला, सुपरहीटही झाला ;पण शाहरुखची क्रेज काही केल्या कमी होताना दिसत नाही. पठाणच्या यशानंतर उलट शाहरुख खानच्या फॅन्समध्ये वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind vs Eng 1st T20: 'वैभव'ची एन्ट्री की संजू-इशानवरच विश्वास? इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11

Pratiyuti Yog 2026: मेहनत करुन पदरी निराशा, लव्ह लाईफमध्ये दुरावा! जुलै महिन्यात ग्रहांचा महाभयंकर खेळ; 'डबल प्रतियुति योगा'मुळे 5 राशींवर ओढवणार संकट

Fake Call Centre Bust: हणजूण येथे बनावट कॉल सेंटरवर छापेमारी, क्राईम ब्रँचकडून 15 जणांना अटक; इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

IND vs ENG: इंग्रजांविरुद्ध भिडणार टीम इंडिया! टी-20 मध्ये भारताचा दबदबा की इंग्लंडची दादागिरी? पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड

Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये महिलेचं लाजिरवाणं कृत्य; 5 तास सुरू होता प्रकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT