New Movies on OTT Dainik Gomantak
मनोरंजन

New Movies on OTT: OTT प्रेक्षकांसाठी बंपर धमाका, वर्षाअखेर पाहायला मिळणार 'हे' चित्रपट

वर्षाचा शेवटचा महिना भरपूर एंटरटेनमेंट घेऊन येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

थिएटरमध्ये फ्लॉप झालेल्या चित्रपटांना ज्या पद्धतीनं ओटीटीवर प्रतिसाद मिळत आहे ते पाहून दर्शकांची पसंती ऑनलाइन प्लॅटफॉर्मला आहे हे दिसतं. आता वर्ष संपत आलं आहे, परंतु वर्षाचा शेवटचा महिना देखील भरपूर एंटरटेनमेंट घेऊन येत आहे. December मध्ये कार्तिक आर्यनचा फ्रेडी, अमिताभ बच्चनचा गुडबाय, मोहनलालचा मॉन्स्टर, मधुर भंडारकरची इंडिया लॉकडाउन आणि विक्की कौशलचा गोविंदा नाम मेरा चित्रपट रिलीज होणार आहेत. पुढे आम्ही डिसेंबर ओटीटी रिलीज डेट आणि टाइमची माहिती दिली आहे.

Freddy

जर तुम्ही कार्तिक आर्यनचे फॅन असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कार्तिकचा ‘फ्रेडी’ चित्रपट थेट ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर 2 डिसेंबरला रिलीज होईल. हा एक साइकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन शशांक घोष यांनी केलं आहे. फ्रेडी एक अशा डेंटिस्टची गोष्ट आहे, ज्याला एकांत आवडतो आणि म्हणून तो कोणताही मिसळत नाही.

India Lockdown

लॉकडाउन हा शब्द अनेकांना अजूनही घाबरवतो. या काळात लोकांचे झालेले हाल दाखवण्यासाठी अजून एक वेब सीरीज India Lockdown रिलीज होणार आहे. यात श्वेता बसु प्रसाद, आहना कुमार, प्रतीक बब्बर, सई ताम्हणकर आणि प्रकाश बेलावडे अशा कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Monster

जर तुम्ही दाक्षिणात्य चित्रपटांचे चाहते असाल तर सुपर स्टार मोहन लालचा चित्रपट Monster ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होईल आणि मल्याळम, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत स्ट्रीम करता येईल. ‘मॉन्स्टर’ मध्ये मोहनलाल एका सिख व्यक्तीची भूमिका साकारत आहे. चित्रपट 21 ऑक्टोबरला मोठ्या पडद्यावर रिलीज झाला आहे आणि 2 डिसेंबरला ओटीटीवर येईल.

Blurr

सस्पेंसनं भरपूर असलेला तापसी पन्नूचा नवा चित्रपट ‘ब्लर’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्म Zee5 वर रिलीज केला जाईल आणि 9 डिसेंबर पासून झी5 वर स्ट्रीम करता येईल. चित्रपटाच्या ट्रेलरवरून समजते की तापसीची चित्रपटात दुहेरी भूमिका आहे, ज्यात ती गायत्री-गौतमी असे दोन पात्र करत आहे. तापसीनं या चित्रपटात फक्त अ‍ॅक्टिंग केली नाही तर चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे.

Good Bye

BIG B म्हणजे अमिताभ बच्चन यांचा चित्रपट Good Bye ओटीटीवर रिलीजसाठी तयार आहे. या चित्रपटात अमिताभ सोबतच रश्मिका मंदाना आणि नीना गुप्ता यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 2 डिसेंबरला Netflix वर स्ट्रीम केली जाईल. तसेच पुष्पा अ‍ॅक्ट्रेस रश्मिका मंदाना या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदीत पदार्पण करेल. गुडबाय 7 ऑक्टोबरला चित्रपटगुहांमध्ये आला होता.

कॉमेडी थ्रिलर असा चित्रपट गोविंदा नाम मेरा ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर येत आहे. जो 16 डिसेंबरला रिलीज केली जाईल. हा थेट -टू-ओटीटी रिलीज केला जात आहे आणि याचे दिग्दर्शन शशांक खेतान यांनी केलं आहे, तर निर्माता करण जौहर आहे. चित्रपटात विक्की कौशलसह कियारा आडवाणी आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT