777 charlie| chief minister bommai Dainik Gomantak
मनोरंजन

Video: '777 चार्ली' पाहून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना अश्रु अनावर

Viral Video: ‘777 चार्ली’ हा चित्रपट पाहिल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई भावूक झाले होते.

दैनिक गोमन्तक

कन्नड चित्रपट '777 चार्ली’ (777 charlie) पाहिल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) इतके भावूक झाले की त्यांना आपले अश्रू अनावर झाले. रडत रडत त्यांनी या चित्रपटाविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. हा चित्रपट कुत्रा आणि एक माणूस यांच्यातील अनपेक्षित पण अपरिहार्य बंध दर्शवतो. जो त्यांच्या नकारात्मक आणि एकाकी जीवनशैलीमुळे एका पवित्र नात्यात बांधला जातो. हा चित्रपट पाहिल्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना त्यांचा लाडका कुत्रा स्नूबी आठवला. जो गेल्या वर्षी मरण पावला होता. (777 charlie watching movie karnataka chief minister bommai brother video viral)

अभिनेता रक्षित शेट्टीचे केले कौतुक

कन्नड चित्रपट '777 चार्ली' (777 charlie) 10 जून रोजी रिलीज झाला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, बसवराज बोम्मई यांनी या चित्रपटाविषयी (Movie) सांगितले की, रक्षित शेट्टीचे पात्र खूप महत्त्वाचे आहे. त्याने शानदार कामगिरी केली आहे. ही भूमिका साकारणे सोपे नव्हते. चार्ली आणि रक्षितच्या पात्रांच्या भावनांची सांगड घातली तर त्यांचा अभिनय अप्रतिम होता. हा चित्रपट सोमवारी सीएम बोम्मई यांच्या खास स्क्रिनिंगसाठी ठेवण्यात आला होता. पहिल्या दिवसापासून या चित्रपटाला भरपूर प्रशंसा मिळत असून पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 6 कोटींची कमाई केली.

चित्रपट पाहिल्यानंतर बोम्मई म्हणाले, या चित्रपटात माणूस आणि प्राणी यांच्यात भावनांचा शंभर टक्के ताळमेळ आहे. विशेषत: कुत्र्याच्या भावनांसह जेव्हा तो फक्त त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याचे डोळे वापरतो. ते म्हणाले, हा चित्रपट अतिशय सुंदर असून सर्वांनी पाहावा. बोम्मई म्हणाले, "मी सतत बोलत राहतो की ते बिनशर्त प्रेम आहे, जे पूर्णपणे शुद्ध आहे. रक्षित शेट्टी आणि चार्ली यांनी या चित्रपटातुन प्रेमात शुद्धता आणली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smriti Mandhana Century: स्मृती मानधनाचं ऐतिहासिक 'शतक'! सलग दोन वर्षांत अशी कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला क्रिकेटपटू VIDEO

तोंडावर गोळी घातली नंतर वाहनाखाली चिरडले; गुरांच्या तस्करीला विरोध करणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या

SBI Bank Robbery: कर्नाटकातील एसबीआय बँकेवर मोठा दरोडा! तीन दरोडेखोरांनी लुटले 21 कोटींचे दागिने आणि रोकड, आरोपी पंढरपूरच्या दिशेने पसार

मोपा विमानतळाबद्दल 'भ्रामक' व्हिडिओ बनवणं पडलं महागात! 'यूट्युबर'ला दिल्लीतून अटक, गोवा पोलिसांची मोठी कारवाई

Mahindra Bolero: महिंद्रा बोलेरो निओचा नवा अवतार लवकरच बाजारात; जाणून घ्या बदललेले डिझाइन, फीचर्स आणि संभाव्य किंमत

SCROLL FOR NEXT