Shah Rukh Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Pathan Controversy: पठाणवर बहिष्कार टाकणाऱ्यांना शाहरुखच्या चाहत्यांचं चोख उत्तर 50 हजार चाहते सज्ज..

शाहरुख खानचा पठाण काही दिवसांतच रिलीज होतोय त्यासाठी आता 50 हजार फॅन्स सज्ज झाले आहेत.

Rahul sadolikar

शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाचा वाद एवढ्या मोठ्या प्रमाणात चिघळला होता कि, हा विषय कधी एकदाचा संपतो असं झालं होतं. चित्रपटातल्या 'बेशरम रंग' या गाण्यावरुन मोठाच गोंधळ निर्माण झाला होता. शाहरुखच्या चित्रपटाला बॅन करा असं कॅम्पेनही चालवण्यात आलं होतं

'पठाण'विरोधात सातत्याने आवाज उठवला जात असताना शाहरुखच्या फॅन्स क्लबने या आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या चित्रपटासाठी कंबर कसली आहे. चित्रपटाचा आनंद साजरा करण्याचा निर्णय घेतला असून भारतातील 200 शहरांमध्ये शाहरुख खानच्या सुमारे 50 हजार चाहत्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

शाहरुख खान तब्बल ४ वर्षांनंतर २५ जानेवारीला 'पठाण' चित्रपटातून रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी बहिष्काराची बरीच हवा आली आहे, पण शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी ही संधी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. 

आता यामुळे येणाऱ्या बातम्या बॉयकॉट करणाऱ्या लोकांना आश्चर्यचकित आणि सोबतच अस्वस्थ करू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख खानचा फॅन क्लब देशभरातील सुमारे ५० हजार चाहत्यांसाठी या चित्रपटाचे प्रदर्शन आयोजित करत असल्याची माहिती आहे.

  SRK युनिव्हर्स या शाहरुख खान फॅन क्लबने याबाबतीत माहिती दिली आहे. SRK युनिव्हर्सचे सह-संस्थापक यश पर्यानी यांनी सांगितल्याप्रमाणे ते देशभरातील सुमारे 200 शहरांमध्ये पठाणचा शो आयोजित करणार आहेत. या शोच्या आधारे किमान एक कोटी रुपयांचे बुकिंग अपेक्षित असल्याचं बोललं जात आहे. 

मुंबईत 7 ते 8 फर्स्ट डे फर्स्ट शो होणार आहेत, तर दिल्लीत 6 शो होतील. त्याचप्रमाणे देशातील इतर शहरांमध्येही असे अनेक शो आयोजित केले जात असल्याची माहिती मिळत आहे.

हा उत्सव पहिल्या दिवसापुरता मर्यादित नसून संपूर्ण प्रजासत्ताक दिनाच्या वीकेंडमध्ये सुरू राहणार आहे. SRK युनिव्हर्सचा यश म्हणतो की, 'या सगळ्यामागील आमची कल्पना शाहरुखच्या चित्रपटांना उत्सवाप्रमाणे साजरी करण्याची आहे आणि पठाण एका उत्सवापेक्षा कमी नाही.'

शाहरुखचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतानाच आता या चित्रपटाचा ट्रेलर दुबईतील सर्वात उंच बुर्ज खलिफा येथे प्रदर्शित होणार असल्याची बातमी आहे. हा एक सन्मान समजला जातो. पठाणचे शूटिंग दुबईमध्येही झाले आहे.

 इंटरनॅशनल डिस्ट्रीब्युशनचे उपाध्यक्ष नेल्सन डिसोझा यांनी याबाबतची माहिती दिली ते म्हणाले , "पठाण हा आपल्या काळातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे आणि यासारखा चित्रपट प्रेक्षकांसमोर भव्य पद्धतीने सादर करायला हवा. 

आम्हाला कळवायला अतिशय आनंद होत आहे की दुबईत शाहरुख खान आणि त्याचा चित्रपट पठाणचं सेलिब्रेशन होणार आहे आणि चित्रपटाचा ट्रेल बुर्ज खलिफा या आर्थिक टॉवरवर दाखवला जाणार आहे". थोडक्यात शाहरुखचे जगभरातले चाहते आपल्या लाडक्या अभिनेत्याचा चित्रपट हिट करणार असंच चित्र सध्या दिसतंय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Film On Ram Temple: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Goa News Live Updates: पिसुर्ले कुंभारखण येथे दीड किलो गांजासह एकाला अटक, वाळपई पोलिसांची कारवाई

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

Vasco Khariwada: खारीवाडा येथे घाऊक मासळी विक्री ठप्प! ग्राहकांत नाराजी; मार्केटातील विक्रेते आक्रमक, पोलिस तैनात

Goa Accidental Death: 192 दिवसांत 143 मृत्‍यू! गोव्यात नेमकं चाललंय काय? 45% बळी युवावर्गाचे

SCROLL FOR NEXT