IFFI Goa  Dainik Gomantak
मनोरंजन

IFFI: 'द काश्मीर फाईल्स'सह 15 भारतीय, आंतरराष्ट्रीय चित्रपटांत प्रतिष्ठेच्या 'सुवर्ण मयुर'साठी चुरस

सुवर्ण मयुराच्या शर्यतीत 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपटांचा समावेश आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर या काळात 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) (53rd International Film Festival of India) आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात 15 भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये प्रतिष्ठेच्या सुवर्ण मयुरासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे देशात वादग्रस्त ठरलेला 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट देखील सुवर्ण मयुराच्या (Golden Peacock Award) शर्यतीत आहे. सुवर्ण मयुराच्या शर्यतीत 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपटांचा समावेश आहे.

(12 International 3 Indian films to compete for Golden Peacock Award)

इफ्फीच्या तिसर्‍या आवृत्तीपासून सुरु झालेल्या सुवर्ण मयुर पुरस्कार आशियातील सर्वाधिक प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कारांपैकी एक मानला जातो. या वर्षी देखील हा पुरस्कार दिला जाणार असून, कोणता चित्रपट या पुरस्काराचा मानकरी ठरणार याची उत्सुकता सिनेरसिकांना लागली आहे. पुरस्कार विजेते निवडण्याचं काम इस्त्रायली लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक नदाव लॅपिड, अमेरिकन निर्माते जिंको गोटोह, फ्रेंच चित्रपट संकलक पास्केल चॅव्हन्स, फ्रेंच डॉक्युमेंटरी फिल्म मेकर, चित्रपट समीक्षक आणि पत्रकार जेव्हियर अँगुलो बर्चुरेन आणि आपल्या भारतातले प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

खालील पंधरा चित्रपट आहेत 'सुवर्ण मयुर' पुरस्काराच्या शर्यतीत

परफेक्ट नंबर (2022), रेड शूज (2022), ए मायनर (2022), नो एन्ड (2021), मेडिटेरेन फिवर (2022), व्हेन दी वेव्ज आर गॉन (2022), आय हॅव इलेक्ट्रीक ड्रिम्स (2022), कोल्ड ​अ‍ॅ​​ज मार्बल (2022), सेवन डॉग्ज (2021), मारिया : द ओशन एंजेल (2022), द काश्मीर फाईल्स (2022), नेझोह (2022), द स्टोरीटेलर (2022), कुरंगू पेडल (2022), द लाईन (2022)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SMAT Final 2025: हरियाणा की झारखंड? कोण उंचावणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी? फायनल सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Goa News Live: जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Goa Weather: राज्यात असंतुलित हवामान, आजारात वाढ शक्य; डॉक्टरांकडून काळजी घेण्याचं आवाहन

Vasco Fish Market: प्रतीक्षा संपली! वास्कोतील मासळी मार्केट 29 पासून खुले, सध्याची जागा 28 पर्यंत खाली करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे निर्देश

बाजारात नाताळची धूम! ख्रिसमस ट्री, सजावट साहित्याची खरेदी जोरात; ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर

SCROLL FOR NEXT