Goa Jobs: नोकरीच्या शोधासाठी लागल्या रांगा

Goa Jobs: मेळाव्याला प्रतिसाद : युवकांसह पालक, तर पत्नीच्या कागदपत्रांसह पतीही हजर
Goa Jobs | Goa News
Goa Jobs | Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Jobs: बांबोळी येथे सुरू झालेल्या दोन दिवसीय खासगी क्षेत्रातील नोकरभरती मेळाव्यास पहिल्या दिवशी इच्छुक उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यास राज्यभरातून इच्छुक उमेदवारांनी उपस्थिती लावली. विशेष बाब म्हणजे मुलांच्या नोकरीसाठी पालकांची, तर पत्नीच्या नोकरीसाठी पतीदेवांची हजेरी विशेष लक्ष वेधणारी होती.

मजूर व रोजगार संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मेगा जॉब फेअर''ला सुरुवात झाली. सकाळी सात वाजल्यापासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून युवक बांबोळी येथील डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये सुरुवात झाली.

स्टेडियमच्या पश्‍चिमेच्या प्रवेशद्वाराबाहेर उभारलेल्या शामियान्यात एका बाजूला मेळाव्यात सहभागी झालेल्या कंपन्यांकडे असणाऱ्या रोजगाराच्या संधीची माहिती देण्यात आली होती. त्याशिवाय दक्षिणेकडे तोंड करून उभारलेल्या इलेक्ट्रॉनिक्स स्क्रिनवर कंपन्यांमधील रिक्त जागांची संख्या दर्शविली जात होती.

निम्म्या उमेदवारांना आज निमंत्रण

  • ज्या उमेदवारांनी ज्या-ज्या कंपनीमध्ये नोंदणी केली आहे, त्यांना मुलाखतीची वेळ दिली जात होती. त्यानुसार इच्छुक उमेदवार निमंत्रणाची वाट पाहत बसलेलेही दिसले.

  • रोजगार मेळाव्यास पंधरा हजारांवर अधिक उमेदवारांनी नोंदणी केल्याने त्यातील निम्म्या उमेदवारांना आज बोलविण्यात आले होते.

  • तर उर्वरित उमेदवारांना 9 तारखेला निमंत्रित करण्यात आले असल्याचे रोजगार आयुक्त राजू गावस यांनी सांगितले.

Goa Jobs | Goa News
Goa News: ठिकठिकाणी वाढते बेशिस्त पार्किंग

नोकऱ्यांसाठी प्रथमच गर्दी

राज्यातील युवक पहिल्यांदाच मोठ्या संख्‍येने खासगी नोकरीसाठी घराबाहेर पडले आहेत. यापूर्वी अशा प्रकारे खासगी नोकरीसाठी गर्दी होत नव्हती, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. मंत्री मोन्सेरात म्हणाले, मी बेरोजगारांच्या व्यथा जाणतो. अनेकांचे पालक मुलांसाठी नोकरी मिळविण्यासाठी आमच्याकडे येतात. मात्र, सर्वांनाच सरकारी नोकरी मिळणे शक्य नाही. त्यामुळे माझ्या खात्याद्वारे रोजगार देणाऱ्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला आहे.

आयोगावरून मंत्र्यांमध्ये मतभेद

विविध खात्यांमधील रिक्त पदे यापुढे राज्य कर्मचारी निवड आयोगामार्फत भरण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री सावंत यांनी ‘मेगा जॉब फेअर’च्या उद्‍घाटनाप्रसंगी केल्यानंतर मंत्रिमंडळातील काहीजण नाराज झाले असून सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना वाटत असलेली चिंता व्यक्त करणार आहेत, अशी माहिती मंत्रिमंडळातील सूत्रांनी दिली.

Goa Jobs | Goa News
Goa Job Scam: गोव्यात परदेशात नोकरीचे आश्वासन देऊन फसवणूकीचे सत्र सुरुच...

एक वर्षाच्या अनुभवाची अट

सरकारी नोकरी हवी असेल तर किमान एक वर्ष तरी खासगी क्षेत्रातील कामाचा अनुभव अनिवार्य असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या 30 वर्षांत नियम व अटी बदललेल्या नाहीत. नोकरी भरतीतील 25 टक्के कायदे हे कालबाह्य असून त्यात बदल करण्याची गरज आहे. दक्षिण गोव्यातही अशाच प्रकारचा रोजगार मेळा लवकरच होईल, असे सावंत म्हणाले.

बाबूश यांची टीम सक्रिय :

मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच अशाप्रकारचा रोजगार महोत्सव होत असल्याने तो यशस्वी करण्यासाठी त्यांचे खाते प्रयत्नशील आहेच, परंतु विशेष बाब म्हणून त्यांची खासगी टीम ही या महोत्सवाच्या नियोजनात सहभागी असल्याचे दिसून आले. त्यांच्यावरही काही जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com