ZP School: Twitter-ANI
महाराष्ट्र

ZP School: एकाच विद्यार्थ्यासाठी दररोज भरते शाळा

ZP School: सरकारी शाळांचा दर्जा खालावल्याचे कारण सांगत पालकाचा कल खाजगी शाळांकडे वळताना दिसत आहे. त्यामुळे सरकारी शाळांमधली विद्यार्थ्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र अशी एक शाळा आहे जी केवळ एकाच विद्यार्थ्यासाठी भरते.

दैनिक गोमन्तक

ZP School: सरकारी शाळांचा दर्जा खालावल्याचे कारण सांगत पालकाचा कल खाजगी शाळांकडे वळताना दिसत आहे. त्यामुळे सरकारी शाळांमधली विद्यार्थ्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र अशी एक शाळा आहे जी केवळ एकाच विद्यार्थ्यासाठी भरते.

विशेष म्हणजे या विद्यार्थ्याला सरकारच्या सर्व सुविधाही मिळतात. महाराष्ट्रात( Maharashtra )ल्या वाशिम( Washim) जिल्ह्यातील गणेशपुरमध्ये ही शाळा आहे.या गावची लोकसंख्या 150 असून जिल्हा परिषदेच्या या शाळेत केवळ एकाच विद्यार्थ्यानं अॅडमिशन घेतलेले आहे. गेल्या दोन वर्षांपासून एकाच विद्यार्थ्यासाठी एक शिक्षकही या शाळेत असल्याची माहिती समोर आली आहे.

इतर सर्व शाळांप्रमाणे इथे रोज राष्ट्रगीत होते.सरकारची मिड-डे मिल अर्थात मध्यान्ह भोजन योजना याठिकाणी राबवली जाते. विशेष म्हणजे, या शाळेत एकच शिक्षक आहेत. या शिक्षकाचं नाव किशोर मानकर असं असून ते या विद्यार्थ्याला सर्व विषय शिकवतात. या विद्यार्थ्याला सरकारच्या सर्व सुविधा मिळतात ज्यामध्ये मिड-डे मिल अर्थात मध्यान्ह भोजनाचाही समावेश आहे

दरम्यान, सकाळी 10.30 ते 12.00 वाजेपर्यंत ही शाळा भरते. या शाळेत सर्व नियमांच पालन केलं जातं. यामध्ये शाळेची सुरुवात राष्ट्रगीतानं होते, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी सरकारच्या सर्व सुविधाही दिल्या जात आहेत. या विद्यार्थ्याला मी स्वतः सर्व विषय शिकवतो, असं शिक्षण किशोर मानकर यांनी सांगितलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

Viral Video: प्रवाशांची गर्दी अन् चोरट्याचा प्लॅन तयार! दिल्ली मेट्रोमध्ये बिनधास्त चोरी; कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ चर्चेत

Saleli Car Fire: सालेलीत कार आगीत जळून भस्‍मसात; 5 लाख रुपयांचे नुकसान; गाडीनं अचानक पेट घेतल्‍यानं खळबळ

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT