Viral Video  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Viral Video: बाईकवर पुढे मागे मुली, मुंबईच्या रस्त्यावर कथित 'बादशहा'चा जीवघेणा स्टंट; पोलिस म्हणाले...

इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये दोन मुलींसह एकजण मुंबईत धोकादायक बाइक स्टंट करताना दिसत आहे

Pramod Yadav

इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये दोन मुलींसह एकजण मुंबईत धोकादायक बाइक स्टंट करताना दिसत आहे. मुंबई पोलिसांनी शुक्रवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओमध्ये हेल्मेट न घातलेला मुलगा, दोन मुलींसोबत बाईक स्टंट करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

व्हिडिओच्या आधारे मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. "बीकेसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू आहे. जर कोणाला या व्हिडिओतील व्यक्तींबद्दल काही माहिती असेल तर तुम्ही आम्हाला थेट डीएम करू शकता." असे मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विटरवर लिहले आहे.

हा व्हिडिओ पोथहोल वॉरियर्स फाउंडेशनने ट्विटरवर पोस्ट केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "खतरनाक स्टंट ज्यामध्ये दोनजण मागे बसले आहेत, एक समोर आणि एक मागे, हेल्मेट नाही. कृपया त्यांना पकडा." असे या ट्विटमध्ये लिहले आहे.

"केवळ दंडच नाही, तर या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या आरोपींवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल." व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दोन्ही महिलांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच एफआयआरमध्ये त्याच्यावर आयपीसीच्या कलम 114 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

दरम्यान, 15 मार्च रोजी, हरियाणा पोलिसांनी एका व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात दोघांना अटक केली. या व्हिडिओत एकजण गुरुग्राममध्ये धावत्या कारमधून चलनी नोटा फेकताना दिसत आहे. याप्रकरणी जोरावर सिंग कलसी आणि गुरप्रीत सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

"दोन्ही आरोपी जोरावर सिंग कलसी आणि गुरप्रीत सिंग यांना अटक करण्यात आली. त्यांनी एक व्हिडिओ केला ज्यामध्ये त्यांच्यापैकी एक गुरुग्राममध्ये धावत्या कारमधून नोटा फेकताना दिसत आहे." असे पोलिसांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: सांतिनेझ परिसरातील तिसवाडी येथे एफडीए मोहीम

Goa Crime: '32 तासांत एकाचा जीव जातोय, गुन्ह्यांची आकडेवारी भयानक पण शिक्षेचे प्रमाण कमी'; विधानसभेत सरदेसाईंचा हल्लाबोल

Goa Crime: 2 वर्षांत 256 देशी-विदेशी पर्यटकांबाबत गुन्‍ह्यांच्‍या घटना! मुख्‍यमंत्र्यांची माहिती; सर्वाधिक प्रकरणे चोरीची

Goa Vegetable Import: शेतीमालासाठी गोवा कर्नाटक, महाराष्‍ट्रावर अवलंबून! 20639 मेट्रिक टनची तफावत; कांदाबटाट्याची वाढली आयात

Liquor Seized: गोव्यात चेकनाक्‍यांवर 3.14 कोटींची दारू जप्‍त! मागच्या वर्षी मोठी कारवाई; मुख्‍यमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT