Karnataka: सहकारी विद्यार्थिनीनेच काढला अंघोळ करतानाचा व्हिडिओ, बेंगळुरूच्या क्रीडा प्राधिकरणातील घटना

पीडित स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) बंगळुरू केंद्रात स्पोर्ट्स कोचिंगचा डिप्लोमा करत आहे.
Viral Video
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

कर्नाटकातील बेंगळुरू येथे असलेल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणात (SAI) शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. तिच्या बॅचच्या आणखी एका विद्यार्थिनीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवल्याचा तिच्यावर आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला असून, आज आरोपी तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर केंद्राने तिला निलंबित देखील केले आहे.

29 मार्च रोजी ही घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे. पीडित स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) बंगळुरू केंद्रात स्पोर्ट्स कोचिंगचा डिप्लोमा करत आहे. असे तिने तिच्या अहवालात म्हटले आहे.

सरावानंतर विद्यार्थिनी कॅम्पसमधील बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी गेली होती. यावेळी तिच्यासोबत शिकणाऱ्या मुलीने मोबाईलमध्ये आंघोळ करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिने या व्हिडिओबद्दल तिच्या सहकारी विद्यार्थ्यीनीला विचारणा केली तेव्हा ती पळून गेली. तिने तातडीने केंद्राच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

Viral Video
NYC Museums: अप्सरा पुन्हा मायदेशी येणार; न्यूयॉर्क म्युझियम भारताला परत करणार 15 प्राचीन मूर्ती

ही घटना उघडकीस आल्यानंतर तातडीने कारवाई करत पोलिसांनी केंद्राच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याप्रकरणी अधिक माहिती घेतली. यानंतर आज आरोपी विद्यार्थ्यीनीला अटक करण्यात आली आहे. यासोबतच तिला केंद्रातून निलंबितही करण्यात आले आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) ची स्थापना 1984 मध्ये झाली. खेळांना प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टता प्राप्त करणे या दुहेरी उद्देशाने SAI उघडण्यात आले. साईची देशात 10 प्रादेशिक केंद्रे आहेत. जी कोलकाता, बंगलोर, गांधीनगर, भोपाळ, सोनीपत, चंदीगड, इंफाळ, लखनौ, गुवाहाटी, मुंबई येथे आहेत. याशिवाय साईची एक्सलन्स सेंटर्सही उपस्थित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com