Amboli Ghaat Dainik Gomantak
महाराष्ट्र

Amboli : मृतदेह फेकायला गेला अन् स्वतःच पडला आंबोलीच्या दरीत, पोलिस चौकशीत धक्कादायक प्रकार आला समोर

घटनास्थळी पोलीस दाखल, शोधकार्य सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

Amboli : आंबोली येथील घाटात मुख्य धबधब्याच्या ठिकाणी असलेल्या दरीत कराड येथील युवक कोसळल्याची घटना घडली आहे. ही दुर्घटना मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

याबाबतची माहिती आंबोली पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून आंबोली रेस्क्यू टीमच्या मदतीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र चौकशीअंती एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकाराची माहिती पोलिसांना मिळाली. पण तपासाअंती भलतीच माहिती समोर येत आहे. विट व्यावसायिकाला दोन ते तीन लाख रुपये देणे लागणाऱ्या इसमाला व्यावसायिकाने आपल्या मित्राच्या सहाय्याने मारहाण केली. या मारहाणीत त्या इसमाचा हृद्यविकाराने मृत्यू झाला.

इसमाचा मृतदेह आंबोलीतील दरीत टाकताना सदर व्यक्तीही पाय घसरुन दरीत कोसळल्याचे समोर आले आहे. या घटनेची साक्षीदार तिसऱ्या व्यक्तीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, वीट व्यावसायिक भाऊसो माने याने एका व्यक्तीला सुमारे तीन लाख रुपये दिले होते. हे पैसे कर्जदाराला परत करता आले नाहीत, त्यामुळे पैसे दिलेल्या भाऊसो या व्यक्तीने कर्जदाराला मारहाण केली.

मारहाणीवेळी त्या व्यक्तीचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. संबंधित व्यक्तीला मारहाण करणाऱ्या व्यक्तींपैकी एका व्यक्तीचे असे म्हणणे आहे अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

मारहाणीत अचानक देणेकऱ्याचा जीव गेल्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कराड येथील वीट व्यावसायिक भाऊसो माने हा एका मित्रासह आंबोलीत आला. अंधारात कुणाला दिसणार नाही म्हणून रात्रीच्या वेळी मृतदेह दरीत फेकण्याचे त्यांनी निश्चित केले.

सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मृतदेह टाकताना मानेही मृतदेहासोबत पाय घसरून खाली खोल दरीत पडला. मानेही दरीत कोसळल्याने त्याच्यासोबत आलेला मित्र घाबरला.

त्याने या घटनेची माहिती माने याच्या कुटुंबियांना दिली तसेच पोलिसांनाही दिली. त्यानंतर पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशीअंती हा खरा प्रकार समोर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT