मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) सुरु असलेली अपघातांची मालिका या उड्डाणपुलामुळे काही प्रमाणात थांबणार. Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा येथील उड्डाणपुलाच्या कामाला लवकरच होणार सुरुवात

एकूण शंभर कोटीचा निधी मंजूर, उड्डाणपुलाचे रेखाचित्र (Drawings of flyovers) तयार, केंद्रीय पातळीवर निघणार निविदा सामाजिक कार्यकर्ते संजय आईर (Sanjay Iyer) यांच्या पाठपुराव्याला आले यश, आपघातांची (Accident) मालिकांना बसणार खिळ

दैनिक गोमन्तक

बांदा: मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) बांद्यातील कट्टा कॉर्नर येथे राष्ट्रीय महामार्ग विभागाने मंजूर केलेल्या 600 मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे अंतिम रेखाचित्र तयार (Drawings of flyovers) करण्यात आले असून, याबाबत लवकरच केंद्रीय पातळीवर निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल असे राष्ट्रीय महामार्ग विभागाने (Department of National Highways) स्पष्ट केले आहे.

या प्रस्तावित उड्डाणपुलासाठी 80 कोटी रुपये तर सटमटवाडी येथील भुयारी बॉक्सवेलसाठी 20 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या दोन्ही कामांचे भूमिपूज मागील वर्षी 7 जुलै 2020 ला करण्यात आले होते. त्यानंतर जमिनीची खोदाई करून माती परीक्षण देखील करण्यात आले. परंतु त्यानंतर पावसाळ्यामुळे याचे चार महिने काम बंद ठेवण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता आय. एस. मणेर, सहाय्यक अभियंता दत्तात्रय जाधव यांनी या उड्डाणपुलाचे रेखाचित्र तयार करून ते रत्नागिरीतील विभागीय कार्यालयात पाठविले आहे. त्यानंतर अंतिम आराखड्याला राष्ट्रीय मार्ग रस्ते विकास महामंडळाने मंजुरी दिल्यानंतर या उड्डाणपुलाचे अंतिम रेखाचित्र तयार करण्यात आले आहे.

याबाबत लवकरच केंद्रीय पातळीवर निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येणार आहे. उड्डाणपुलाचे अंतिम रेखाचित्र स्थानिक बांदा ग्रामपंचायतीला देखील माहितीसाठी पाठविण्यात आले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील सुरु असलेली अपघातांची मालिका या उड्डाणपुलामुळे काही प्रमाणात थांबण्याची शक्यता आहे. या महामार्गावर सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांनी 26 जानेवारी 2019 ला उपोषणाचे हत्यार उगारले होते. त्यानंतर याठिकाणी उड्डाणपूल करण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर सातत्याने आईर यांनी वरिष्ठ पातळीवर याचा पाठपुरावा करत याठिकाणी उड्डाणपूल मंजूर करून घेतला. आता याचा अंतिम आराखडा देखील तयार झाला असल्याने याचे काम लवकरच सुरु होईल.

उड्डाणपुलाचे अंतिम रेखाचित्र तयार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT