राजू शेट्टी Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाविकास आघाडीसोबत काय करायचे?; राजू शेट्टी

जेथे उसाची (Sugarcane) चांगली रीकव्हरी (Recovery) होत आहे त्या भागात पहिली उचल 3300 रुपयांची मिळाली पाहिजे, अशी आमची शेतकऱ्यांची (Farmers) मागणी आहे. असे राजू शेट्टी (Raju Shetti) म्हणाले.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र: स्वाभिमानी शेतकरी संघटना ही महाविकास आघाडी मध्ये येते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री (CM) व्हावे यासाठी आम्ही अनुमोदक होतो. परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नाना विश्वासात घेतलेले नाही. तसेच ज्या कारखान्याकडून एकरक्कमी FRP देणार नाही ते कारखाने स्वाभिमानी चालू देणार नाही. तसेच येणाऱ्या काळात महाविकास आघाडीबरोबर रहायचे की नाही याबाबतचा निर्णय राज्य कार्यकारणी ठरवणार आहे असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी पत्रकारांशी संवाद साधनात दिला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, महाविकास आघाडीवर मी नाराज असून याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी उस वाहतुकीसाठी (transportation) घालण्यात आलेली बंदी हा देखील प्रश्न आहे. तसेच उस दर नियंत्रण समितीला दुबळी केली आहे. असा आरोप राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर केला.

तसेच, किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्य सरकार मधील अनेक मंत्र्यावर जे आरोप केले आहेत त्यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी म्हणाले की, सोमय्यांनी फक्त मोजकीच नावे घेऊ नये. पाच वर्षांपूर्वी आम्ही याच कारखान्यांच्या (factories) यादया दिल्या होत्या. तसेच पोलीस स्टेशनमध्ये (Police Station) ही तक्रार दाखल केली होती. मात्र आतापर्यंत त्यामध्ये पुढे काहीही झालेले नाही.

पुणे जिल्ह्यातील यशवंत सहकारी साखर कारखान्यासाठी आम्ही अनेकदा माजी मुख्यमंत्री फडणवीस (Fadnavis) यांना भेटलो होतो. पण त्यावर कोणतीही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. मग भाजपचे (BJP) नेते काही मोजक्याच कारखान्यांच्या चौकशीची मागणी का करतात.

या सरकारने शेतकऱ्यांना फसवले:

राज्य सरकारने शेतकऱ्यांचा केसाने गळा कापला आहे असा आरोप राजू शेट्टी यांनी दोन दिवसांपूर्वी जयसिंगपूर (Jaisingpur) येथे पार पडलेल्या उस परिषदेत केला. एकरकमी एफआरपी दिले नाही त्यामुळे आता आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विनाकपात एकरकमी एफआरपी द्यावी, महापुरातील नुकसान झालेल्या उसाला प्रति गुंठा 950 रूपये नुकसान भरपाई द्यावी, तसेच अतिवृष्टीमध्ये (heavy rains) उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 50 हजार रूपयांची मदत करावी यश 12 ठराव करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT