Devendra Fadnavis & Eknath Shinde Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात Cabinet विस्तार का होत नाही? शिंदे गटाच्या आमदारांनी सांगितले खरे कारण

Devendra Fadnavis & Eknath Shinde: विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

दैनिक गोमन्तक

Maharashtra politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला असला तरी राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. यावरुन विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मात्र, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे शिंदे आणि फडणवीस सांगत आहेत. तर, मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिरंगाईमागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न लोक करत आहेत. याबाबत दोन्ही बाजूंकडून अद्याप स्पष्टपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.

दरम्यान, किती मंत्रीपदे कोणाला द्यायची? दोन्ही पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी कॅबिनेट फॉर्म्युला काय आहे? त्यामुळे विस्तारीकरण रखडल्याचे बोलले जात आहे. मात्र आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मंत्रिमंडळ विस्तार रखडण्याचे खरे कारण सांगितले आहे.

मंत्रिमंडळ विस्तार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहत थांबला?

काल मुंबईत (Mumbai) प्रसारमाध्यमांशी बोलताना दीपक कारेसरकर म्हणाले, ''पक्षांतर्गत लोकशाही असावी की नसावी, हे सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयावरुन ठरेल. मुदतवाढ मिळण्यास वेळ लागू शकतो, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करणे क्रमप्राप्त आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखत आहोत. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही.” केसरकर पुढे म्हणाले की, 'अंतरिम आदेश सोमवारी येईल आणि त्यानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल.'

दुसरीकडे, मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादी समोर आली आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, नितेश राणे, बबनराव लोणीकर यांना भाजपच्या कोट्यातून मंत्री केले जाण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटातून शंभूराजे देसाई, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर यांची नावे पुढे आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Velsao Gram Sabha: वेळसाव ग्रामसभेचा मोठा निर्णय! मेगा प्रकल्पांच्या बांधकामावर बंदी; 'कचरा, पाणी आणि रस्त्यांची भेडसावतेय समस्या

Data Protection Law: चिंता मिटली! खरेदी करताना नाही द्यावा लागणार मोबाईल नंबर, ग्राहकांच्या गोपनीयतेसाठी सरकार आणतयं नवा कायदा

Kabul Bus Accident: काबूलमध्ये भीषण अपघात, प्रवासी बस उलटून 25 जणांचा मृत्यू; 27 जखमी

Love Horoscope: जोडीदाराला थोडा वेळ द्या! अनुभवा 'मोठे' बदल; वाचा प्रेम राशीफळ

Michael Clarke Cancer: विश्वचषक जिंकवून देणाऱ्या स्टार क्रिकेटपटूला कर्करोग, पोस्ट करत दिली माहिती

SCROLL FOR NEXT