Amruta Fadnavis Dainik Gomantak
महाराष्ट्र

Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यात व्हिडिओ कोणी शूट केला? अनिक्षाप्रकरणाला नवं वळण

Amruta Fadnavis: आता पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमन्तक

Amruta Fadnavis: गेल्या काही दिवसांपासून अमृता फडणवीसांना एक कोटी लाच दिल्याचा मुद्दा गाजत आहे. आता याबाबत आणखी माहिती समोर आली आहे.

अनिक्षा जयसिंगांनी आणि अनिल जयसिंगानी सतत संपर्कात होते अशा प्रकारची माहिती समोर आली आहेत. अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करताना अनिक्षा आणि अनिल जयसिंगानी एकमेकांना मोबाईलच्या माध्यमातून सतत संपर्कात होते.

अनिल जयसिंगानी गेल्या 8-9 वर्षापासून फरार आहे. अमृता फडणवीसांनी अनिक्षाला उत्तर दिल्यानंतर त्याचे स्क्रीनशॉट अनिक्षाने लगेच आपल्या वडिलांना म्हणजेच अनिल जयसिंगांनी यांना पाठवल्याचे समोर आले आहे.

महत्वाची बाब म्हणजे, अनिक्षाने अमृता फडणवीस यांना सागर बंगल्यात बॅग पोहोचवल्याचा व्हिडिओ पाठवला होता. हा व्हिडिओ सागर बंगल्यात कुणी शूट केला असा प्रश्न उपस्थीत होत असून आता पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिक्षाने बॅग पोहोचवल्याचा व्हिडिओ कोणी शूट करणाऱ्या दोघांची नावे सांगितली आहेत. मात्र या दोन्ही व्यक्तींनी आपला याप्रकरणाशी काही संबंध नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, अनिक्षा जयसिंगानी आणि अनिल जयसिंगानी यांनी देवेंद्र फडणवीसांकडून काम करुन घेण्यासाठी अमृता फडणवीसांच्या माध्यमातून लाच दिल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अमृता फडणवीस यांनी केली आहे.

अमृता फडणवीस यांनी एक कोटी रुपयांची लाच दिल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला लाच देण्याचा प्रयत्न केला गेला आणि नंतर ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली असल्याचे या एफआयआरमध्ये म्हटले आहे.

विधानसभेत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी याप्रकरणाविषयी विचारलेल्या प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण प्रकरण विधानसभेत सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस( Devendra Fadnavis ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2015-16 पासून अनिक्षा ही अमृतांच्या संपर्कात होती. तिने त्यांचा विश्वास संपादन केला.

देवेंद्र फडणवीस पून्हा सत्तेत आल्यानंतर अनिक्षाने तिचे वडील चुकीच्या आरोपांखाली फसल्याचे सांगितले आणि त्यांना सोडवण्यासाठी मदत करण्यासाठीही सांगण्यात आले. त्यानंतर बुकीजच्या माध्यमातून आपण पैसे कमवू शकतो अशा प्रकारची ऑफर दिली.

यानंतर मात्र अमृता यांना तिला ब्लॉक केले आणि यानंतर हे लाच देऊन ब्लॅकमेल करण्याचा प्रकार सुरु झाला असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT