Warkari Dainik Gomantak
महाराष्ट्र

VIDEO: विठुरायाच्या भेटीची ओढ लागली जिवा, पाहा वारकऱ्यांचा पालखी सोहळा

विठुराया तुझ्या भेटीची आम्हाला ओढ लागली, महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांच्या (Warkari) जिवाची घालमेल सुरू झाली आहेविठुराया तुझ्या भेटीची आम्हाला ओढ लागली, महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांच्या (Warkari) जिवाची घालमेल सुरू झाली आहे.

दैनिक गोमन्तक

विठुराया तुझ्या भेटीची आम्हाला ओढ लागली, महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांच्या (Warkari) जिवाची घालमेल सुरू झाली आहे, लवकरात लवकर हे जगभर पसरलेलं कोरोनाचं संकट (Corona Crisis) दूर कर, असे साकडे लाखो वारकरी विठुरायाचरणी घालत आहेत. श्री क्षेत्र देहूतून तुकोबारायांचा पालखी सोहळा (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala) आज मर्यादित वारकऱ्यांसह पंढरीकडे (Pandharpur) प्रस्थान करत आहे. (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala Dehu)

आषाढी एकादशी जसजशी जवळ येते तसतशी विठोबाच्या भेटीची आस लाखो वैष्णव जणांना लागते. वारी म्हणजे वारकऱ्यांसाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण. संतांच्या संगतीत पांडुरंगाच्या भेटीला पंढरीला जाण्यासाठी वारकरी वर्षभर आषाढी वारीची आतुरतेने वाट पाहतात.

आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र देहूतून वारीसाठी पंढरीकडे प्रस्थान ठेवणाऱ्या श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहूत लाखो वारकरी दाखल होत असतात. 336 वर्षापासून सुरु झालेली पायी वारीची परंपरा आजही अविरतपणे सुरु असून मानकरी, धारकरी, सेवेकरी आणि दिंड्यासह पालखी सोहळा विठूरायाच्या पंढरीसाठी मार्गस्थ होतो. राज्याच्या कानाकोपऱ्यामधून लाखो वारकऱ्यासंह देहूमधील 17 दिवसांच्या मुक्कामानंतर हा सोहळा पंढरपूरला पोहोचतो.

दरम्यान, देहूकरांसाठी प्रस्थान सोहळा म्हणजे आनंदी पर्वणीच असते. देहूमध्ये उत्साहाचे वातावरणासह सोहळ्याची दोन महिने आगोदरपासून तयारी सुरु होते. पालखी रथाच्या बैलजोडीची निवड करणे, सेवेकरी, मानकरी, दिंडीप्रमुखांना पत्रव्यवहार, शासनाच्या वेगवेगळ्या विभागांशी पत्रव्यवहार सासहमुक्त कामाच्या ठिकाणी पाहणी तेथील व्यवस्थेची पाहणीसंबंधी तपासणी करणे इत्यादी संबंधी तयारी सुरु असते. वारीमध्ये सहभागी होत असणाऱ्या वारकऱ्यांची सेवा केली तर साक्षात भगवंताची सेवा घडते, या पवित्र भावनेतून वारकऱ्यांच्या सेवेसाठी वारकरी उत्सुक असतात. दरम्यान, प्रस्थान सोहळ्याच्या सुमारे महिनाभर आगोदरपासून ही वारकऱ्यांची लगबग पहायला मिळते. यावर्षी मात्र कोरोनाच्या पाश्वभूमीवर वारकऱ्यांच्या उपस्थितीत देहूत गुरुवारी प्रस्थान सोहळा होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

SCROLL FOR NEXT