youth misbehaves with foreign woman Dainik Gomantak
महाराष्ट्र

Viral: देशाचं नाव खराब होतंय... विदेशी महिलेसोबत तरूणांकडून सेल्फीचा बहाणा, पुढे जे घडलं ते संतापजनक! पाहा VIDEO

youth misbehaves with foreign woman in mumbai: भारत हा जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू मानला जातो. येथे असलेल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे दरवर्षी लाखो परदेशी पर्यटक भारतात भेट देतात.

Sameer Amunekar

Mumbai Youth Misbehaves with Foreign Woman During Selfie Viral Video

मुंबई : भारत हा जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू मानला जातो. येथे असलेल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे दरवर्षी लाखो परदेशी पर्यटक भारतात भेट देतात. त्यात मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया हे एक प्रमुख पर्यटन स्थळ असून, येथे दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र, सध्या गेटवे ऑफ इंडियाजवळ घडलेल्या एका संतापजनक प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये काही भारतीय युवकांनी एका विदेशी पर्यटक महिलेसोबत गैरवर्तन करत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप घातलेली एक परदेशी महिला गेटवे ऑफ इंडिया परिसरात पर्यटनाचा आनंद घेताना दिसते. यावेळी अचानक एक युवक तिच्या मागून येतो आणि परवानगी न घेता तिच्या खांद्यावर हात ठेवून सेल्फी काढतो.

हा प्रकार पाहून तिथे उपस्थित इतर युवक देखील धाडसाने पुढे येतात आणि तिच्या जवळ जाऊन एकामागून एक सेल्फी घेऊ लागतात.

महिला या घोळक्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाही तिला कोणीही सहजतेने जाऊ देत नाही. तिच्याभोवती पुरुषांचा मोठा जमाव जमा झाल्यामुळे ती स्पष्टपणे अस्वस्थ दिसत आहे.

या संतापजनक वर्तनामुळे अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी भारतीय संस्कृतीला कलंक लावणारा हा प्रकार असल्याचे मत व्यक्त केलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नाव, आडनावात बेकायदेशीरपणे बदल कराल तर खबरदार; तीन वर्षापर्यंत होऊ शकते शिक्षा, अधिवेशनात लक्षवेधी

Viral Video: रस्त्याच्या मधोमध सांडांची WWE स्टाईल फाईट! स्कूटीवरुन जाणारी तरुणी सापडली कचाट्यात; थरारक व्हिडिओ व्हायरल

Goa News: चर्चमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करा; आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांची मागणी

Goa Assmbly Live: लाटंबार्से औद्योगिक वसाहतीसाठी 38 कोटींचे वीज उपकेंद्र तातडीने उभारा; आमदार चंद्रकांत शेट्ये यांची सरकारकडे मागणी

Pregnancy: प्रेग्नेंसीमध्ये वाढता रक्तदाब ठरु शकतो जीवघेणा! आई आणि बाळासाठी धोक्याची घंटा; जाणून घ्या 'प्री-एक्लेम्पसिया'ची लक्षणे

SCROLL FOR NEXT