या दंगली अमरावती (Amravati), नांदेड औरंगाबादसह मराठवाड्याच्या काही भागात सुरु आहे.  Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्रात अमरावतीतील बंदला हिंसक वळण

या दंगली अमरावती (Amravati), नांदेड औरंगाबादसह मराठवाड्याच्या काही भागात सुरु आहे. भाजपचा महाराष्ट्राला (Maharashtra) अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. भाजपला अनेक चाैकश्यालावूनही सरकार पाडता येत नाही. त्यामुळे भाजपचे लोक आता दंगली घडविण्याचे कारस्तान सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

त्रिपुरा हिंसाचाराचे पडसाद आजही महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक भागात पहावयास मिळत आहे. शनिवारी अमरावतीमध्येही (Amravati) अंदोलनाला (Agitation) हिंसक मिळताना दिसत आहे. अमरावतीमध्ये आज भाजपच्यावतीने (BJP) बंद पाळण्यात आला होता. परंतू या बंदला हिंसक वळण लागले. आंदोलक कर्त्यांकडून दगडफेक करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जमावाकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली. अमरावतीत पोलिसांचा बंदोबस्त या आंदोलन कर्त्यांना शांत करण्यासाठी कोठेतरी कमी पडताना दिसत होता. अमरावतीत शनिवारी सकाळी तणाव निर्माण झाला होता. हिंसक आंदोलन कर्त्यांवर पोलिसांनी लाठिचार्ज देखील करण्यात आला. कारण आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आंदोलन कर्त्यांनी अमरावतीतील राजकमल चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तेथेही या आंदोलनाला हिंसक वळण पहावयास मिळाले. आमरावती शहर बंद करण्यात आले. काल अमरावतीत जिल्हाधिकार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाला देखील हिंसक वळण लागले होते.

याबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या माध्यमातून मी वैयक्तिकरित्या त्यावर लक्ष ठेवत आहे. कोणी दोषी आढळल्यास त्याला सोडले जाणार नाही. आपण सामाजिक सलोखा राखला पाहिजे, मी सर्वांना आवाहन करतो. मी पोलिसांनाही परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन करतो. संयम आणि शांतता राखा." ते पुढे म्हणाले, "त्रिपुरातील हिंसाचाराच्या विरोधात आज राज्यभरातील मुस्लिमांनी निषेध मोर्चा काढला. यादरम्यान नांदेड, मालेगाव, अमरावती आणि अन्य काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली. मी सर्व हिंदू आणि मुस्लिमांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. अमरावतीत अधीकची फौज पाठविण्याच्या सूचना गृहमंत्री दिलिप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिल्या आहेत.

महाराष्ट्र अस्थिर करण्याचा भाजपचा प्रसत्न : संजय राऊत

या दंगली अमरावती, नांदेड औरंगाबादसह मराठवाड्याच्या काही भागात सुरु आहे. भाजपचा महाराष्ट्राल अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. भाजपला अनेक चाैकश्यालावूनही सरकार पाडता येत नाही. त्यामुळे भाजपचे लोक आता दंगली घडविण्याचे कारस्तान सुरु आहे. राज्य सरकार अस्थिर करायचे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा असा भाजप प्रयत्न करत आहे. असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.

दरम्यान, काल मुस्लिम संघटनांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये बंदची घोषणा केली होती, यादरम्यान तीन शहरांमध्ये हिंसाचार उसळला होता. नांदेड, मालेगाव येथे उसळलेल्या हिंसाचारात सुमारे 23 जण आणि 7 पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. दोन्ही शहरांमध्ये जमावाने दुकानांना लक्ष्य करून तोडफोड केली. दुसरीकडे, अमरावतीमध्ये जमावाने सुमारे 22 दुकानांना आग लावली. या तोडफोडीच्या निषेधार्थ भाजपने आज अमरावतीत बंदची घोषणा केली आहे. हिंसाचाराच्या घटनांप्रकरणी पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे.

अलीकडेच त्रिपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर जातीय हिंसाचार झाल्याचा आरोप मुस्लिम संघटना करतात. बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या हल्ल्यानंतर त्रिपुरातील वातावरण तापले होते. तेथे त्यांना धमकावले जात असल्याचा आरोप मुस्लिम संघटनांनी केला. मशिदींचे नुकसान आणि तोडफोड झाल्याच्या बातम्याही आल्या. मात्र पोलिसांनी तपासात हे वृत्त फेटाळून लावले. पण ते तणावपूर्ण वातावरण आणि काही सोशल मीडिया पोस्टमुळे देशभरात त्रिपुरा हिंसाचाराचा निषेध झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

National Education Policy Goa: पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 10 वी अन् 11वीतही 'NEP' लागू होणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Goa Assembly Three Day Session: सहा महिन्यांचा हिशेब ३ दिवसांत! विरोधी पक्षनेत्यांची टीका, 31ऑगस्‍ट ते 2 सप्‍टेंबर अल्प कालावधीचे अधिवेशन

Student Protest Firing Allegations: 'गृहमंत्र्यांनीच दिला आंदोलकांवर गोळीबाराचा आदेश!' लोकसभेत परीक्षा दुरुस्ती विधेयक मंजूर, विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपाने संसदेत गदारोळ

Goa liquor Smuggling In Telangana: गोवा-तेलंगणा हवाई मद्यतस्करीचा पर्दाफाश; 98 महागड्या बाटल्या जप्त, 2 जण ताब्यात, तपास सुरू

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

SCROLL FOR NEXT