Vatsavitri 
महाराष्ट्र

कुडाळमध्ये पुरुषांनी केली वडाची पूजा; पाहा व्हिडिओ

गोमन्तक वृत्तसेवा

सिंधुदुर्ग: दरवर्षी जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून स्त्रीया वट पौर्णिमेची(Vatsavitri) दिवशी वडाची पूजा करतात. मात्र कुडाळ(Kudal) गवळदेव या ठिकाणी 2009 पासून पुरुषांकडून वडाच्या फेऱ्या मारून पूजा केली जाते. गेले तेरा वर्ष ही प्रथा या पुरुषांनी कायम ठेवली आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील पुरुष सहभागी दरवर्षी होत असतात . कुडाळमध्ये पुरुषांकडून वडाची पूजा(worship) केली जात आहे. दरवर्षी महिला वट पौर्णिमेला हाच पती जन्मोजन्मी मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात, मात्र यावेळी सुध्दा पुरुषांनी ह्याच जन्मी हीच बायको मिळो अशी वडाच पूजा करून वडाला साकडं घातलं आहे.(Men worship Vatsavitri In Kudal)

दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात खासकिलवाडा (आयुर्वेदिक कॉलेज जवळील) सुहासिनी या वटसावित्रीची वाण देऊन पुजा करुन वडाला फेरा मारतात. वटसावित्रीला वाण देतात कारण इथे वटसावित्रीचे मंदीर आहे. जे अतिशय जागृत आहे. मेस्त्री परीवाराने या वटसावित्री महापुरुष देवस्थानची स्थापना केली आहे असे सांगण्यात येत आहे. नेमकी नोंद नाही, पण प्लेगच्या काळात शहरात प्लेग पसरत असताना मात्र देवीला गाऱ्हाणे घातल्यावर या भागात प्लेगची साथ आली नाही. असे सांगण्यात येते.

महाराष्ट्र राज्यातील एकमेव वटसावित्रीचीचे मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. गोव्यापासून जवळच असलेल्या सावंतवाडी शहरात हे मंदीर आहे. वटपौर्णिमा दिवशी या भागातील सुहासिंनीसोबत अन्य भागातील सुहासिनी देवीला वाण द्यावयासाठी येथे येतात. आणि या मंदीराची खासियत म्हणजे ते कठड्यात आहे. महाराष्ट्र राज्यातील एकमेव जुन्या श्रीदेवी वटसावित्रीचे एकदा दर्शन घ्यायलाच हवे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT