Sunil Shende Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sunil Shende: 'सर्कस'मध्ये शाहरूखच्या वडिलांची भूमिका करणारे सुनील शेंडे यांचे निधन

रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि खडा आवाज यामुळे विविध भूमिकांतून ते लोकांच्या लक्षात राहिले.

गोमन्तक डिजिटल टीम

Sunil Shende: मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन झाले आहे. ते 75 वर्षांचे होते. रात्री 01 वाजता मुंबईतील विले पार्ले याठिकाणी असणाऱ्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुनील शेंडे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि खडा आवाज यामुळे विविध भूमिकांतून ते लोकांच्या लक्षात राहिले.

(Veteran actor Sunil Shende, best known for roles in Shanti and Sarfarosh, dies)

मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टीत काम केलेल्या सुनील शेंडे यांच्या पश्चात पत्नी ज्योती, दोन मुले ऋषिकेश आणि ओंकार, त्याचप्रमाणे सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही काळापासून मात्र ते सिनेइंडस्ट्रीपासून दूर होते. अभिनेत्याच्या जाण्याने मराठी सिनेविश्वात न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

मराठीसह हिंदी मालिका, सिनेमांमध्ये सहज अभिनय, शब्दांवरील पकड आणि स्पष्ट शब्दोच्चार यामुळे ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे प्रतिभावंत अभिनेता हरपला असल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

चित्रपटातील कारकीर्द

मराठीशिवाय त्यांनी वास्तव, गांधी, सरफरोश या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय सनी देओलचा 'घायल', संजयचा 'खलनायक' या सिनेमातही ते दिसले होते. मराठीत निवडुंग (1989), मधुचंद्राची रात्र (1989), जसा बाप तशी पोर (1991), ईश्वर (1989), नरसिम्हा (1991) या सिनेमांमधून त्यांनी विशेष लोकप्रियता मिळवली.

शाहरुख खानसोबत सर्कस या मालिकेतही काम केले होते. या मालिकेत त्यांनी शाहरुखच्या वडिलांची भूमिका साकारली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Metro Project: 'प्रकल्प नेमका कुणासाठी?' वॉटर मेट्रोच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह

Viral Video: 'एक चूक आणि खेळ खल्लास...' धावत्या लोकलच्या दारात तरुणीचा धोकादायक डान्स; व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा

Jantar Mantar Student Protest: जंतर मंतर छू:मंतर; गांधीवादी मार्गाने जिंकला जंतर-मंतरवरील लढा

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक VIDEO शेअर करत म्हणाला, "मी माझ्या फलंदाजीमध्ये..."

खरी कुजबूज: काँग्रेस विचार बदलणार?

SCROLL FOR NEXT