MNS Raj Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

घरच्या लग्नकार्याला वसंत मोरेंनी केलं बाय-बाय, राज साहेबांच्या सभेला राहणार हजर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाण्यातील उत्तरसभेची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली.

दैनिक गोमन्तक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्या ठाण्यातील उत्तरसभेची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली. या सभेला राज्यातून अनेक नेते ठाण्यात दाखल होताना दिसत आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून मनसे नगरसेवक वसंत मोरे यांच्याबाबत वावड्या उठवल्या जात होत्या. सोमवारी मोरे यांनी शिवतीर्थवर राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर वसंत मोरे यांच्या मनसे सोडण्याच्या चर्चेला कुठेतरी पूर्णविराम मिळाला. ठाण्याच्या सभेला ये, तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं राज ठाकरेंनी वसंत मोरे यांना सांगितलं होतं. त्यानुसार मोरे ठाण्यात सभेला उपस्थित राहून भाषणही करणार असल्याचं म्हटलं जात आहे. (Vasant More did the house wedding bye bye will be present at Raj Sahebs meeting)

याबाबत वसंत मोरे (Vasant More) म्हणाले की, माझ्या पाठीवर राजसाहेबांचा कायम हात आहे, माझा साहेबांवर खूप विश्वास आहे. ठाण्याच्या सभेत राज ठाकरेंनी भाषण करण्याची संधी मला दिली आहे. अनेक गोष्टी मनात साठवून ठेवल्या आहेत, आणि त्या मी तिथे बोलून दाखवेन. मागील 15 वर्षापासून पक्षीय राजकारणात मनसे वाढवण्यासाठी मी कायम सक्रीय राहिलो आहे. पक्ष बांधणीसाठी माझी सुरुवात झाल आहे. पुणे महापालिकेत मी 20-25 नगरसेवक मनसेचे निवडून आणणारच आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विषयाशी माझी तुलना होऊ शकत नाहीये. राज ठाकरे अतिशय संवेदनशील नेते आहेत. नेतृत्व खंबीर आहे म्हणून मी डळमळीत झालो नाही असं त्यांनी मला सांगितले.

तसेच भविष्यात राज ठाकरे महाराष्ट्राला एका (Maharashtra) उंचीवर घेऊन जाणार आहेत, आणि राज ठाकरेंना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. मतांमध्येही परिवर्तित होताना दिसत आहे. कार्यकर्त्यांनी तळागाळातल्या शेवटच्या माणसांपर्यंत विकासाचे मुद्दे पोहचवायला हवे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून मला माझ्या प्रभागात विकासाच्या मुद्द्यावर लोकं निवडून देतात. सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायला हवे. जर हे काम झाले मनसे ही महाराष्ट्रातील तरूणांची सर्वात मोठी संघटना असेल असा विश्वास नगरसेवक वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान 9 तारखेला ठाण्याला सभा होती तेव्हा मी उपस्थित राहणार होतो, पण ही सभा रद्द होऊन ती 12 तारखेला घेण्यात आली आहे. 12 ला माझ्या मोठ्या भावाच्या मुलाचं लग्न आहे. मात्र साहेबांनी सोमवारी सभेला ये असं मला सांगितलं. मग आधी लग्न कोंढाण्याचं, घरचा कार्यक्रम घरचे करतील, मी कुटुंबात लहान आहे, माझे दोन भाऊ मोठे आहेत. ते लग्नाच्या समारंभाचा कार्यक्रम पार पाडतील. मी ठाण्याच्या सभेसाठी पुण्याहून निघालो आहे असं वसंत मोरे यांनी मुंबई तकला मुलाखतीत सांगितलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kaalbhairav Jayanti 2025: कोण सर्वश्रेष्ठ? ऋग्वेदाचे उत्तर ऐकून ब्रम्हदेव हसले, भगवान शंकरानी धड वेगळे केले; कालभैरवाच्या अवताराची कथा

Horoscope: जुनी कामे पूर्ण करण्याची संधी, चांगला निर्णय भविष्याचा मार्ग बदलणार; जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य

'गोंयत कोळसो नाका' आंदोलनाला विरोधी पक्षांची एकजूट! आलेमाव, सरदेसाई अन् परबांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, 'कोळशाच्या मुद्यावर गप्प बसणारे आता...'

Goa Sex Racket Bust: वास्को पोलिसांची दाबोळीतील 'स्पा'वर छापेमारी, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सहा महिलांची सुटका; दोघे अटकेत

Krishnaji Kank: फोंडा किल्ल्यासाठी शंभूराजे दौडत आले, गोव्याचा गव्हर्नर पोर्तुगीज सैन्यासह पळत सुटला; शूरवीर कृष्णाजी कंकांची कथा

SCROLL FOR NEXT