Vadhavan Port Dainik Gomantak
महाराष्ट्र

Vadhavan Port: वाधवन बंदर महाराष्ट्राच्या विकासात लावणार चार चांद; ग्लोबल ट्रेड पॉवरहाऊस होण्याच्या दिशेने वाटचाल!

Vadhavan Port transform Maharashtra: भारतीय किनारीपट्टी भागात आर्थिक विकासाच्या भरपूर संभावना आहेत. मात्र, पायाभूत सुविधांअभावी किनारपट्टीचा योग्य वापर होऊ शकला नाही.

Manish Jadhav

Vadhavan Port transform Maharashtra: भारतीय किनारीपट्टी भागात आर्थिक विकासाच्या भरपूर संभावना आहेत. मात्र, पायाभूत सुविधांअभावी किनारपट्टीचा योग्य वापर होऊ शकला नाही. मात्र आता महाराष्ट्राच्या अरबी किनारपट्टीवरील वाधवन बंदर विकासाची नवी गाथा रचण्यासाठी सज्ज झाले आहे. या बंदराच्या विकासामुळे ते भारतातील सर्वात मोठे बंदर तर होईलच शिवाय महाराष्ट्रातील अनेक भागांच्या विकासाला चालना देखील मिळेल.

दरम्यान, 2040 पर्यंत जगातील टॉप 10 कंटेनर बंदरांपैकी एक बनण्याची क्षमता असलेले वाधवन हे 76,220 कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चासह अत्याधुनिक, ग्रीनफील्ड बंदर असणार आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळ असलेले हे बंदर देशातील सागरी पायाभूत सुविधा आणि आर्थिक महत्त्वकांक्षेच्या नव्या युगाची सुरुवात करत 23 दशलक्ष TEUs (ट्वेंटी-फुट इक्विवेलेंट यूनिट) हाताळेल असा अंदाज आहे.

कोण विकसित करणार?

जवाहरलाल नेहरु पोर्ट अथॉरिटी (JNPA) आणि महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड (MMB) द्वारे गठित वाधवन पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड (VPPL) द्वारे हे बंदर विकसित केले जाईल. जेएनपीएची 74 टक्के इक्विटी भागिदारी आणि एमएमबीची 26 टक्के इक्विटी भागिदारी असलेला हा संयुक्त प्रोजेक्ट भारताच्या बंदर विकास धोरणातील एक महत्त्वाचा असणार टप्पा आहे. विशेष म्हणजे, केंद्र आणि राज्य सरकारच्या मालकीच्या संस्था संयुक्तपणे ग्रीनफील्ड बंदर विकसित करत असलेले हे पहिले उदाहरण आहे. या बंदर विकासाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात आर्थिक परिवर्तनाची नवी सुरुवात होणार आहे.

कनेक्टीव्हिटी

वाधवन बंदर डेडिकेटेड रेल्वे फ्रेट कॉरिडॉरपासून केवळ 12 किमी तर मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवेपासून 22 किमी अंतरावर स्थित आहे. हे बंदर महाराष्ट्र, गुजरात आणि त्यापुढील औद्योगिक केंद्रांशी जोडले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

Konkan Migration: आफ्रिकेतून आलेले, होमो प्रजातींमधून विकसित झालेले काही मानव किनाऱ्यावर स्थायिक झाले; कोकणातली स्थलांतरे

Hybrid Car: कार घेण्याचा विचार करताय? 1200 किमी मायलेज असलेल्या 'या' 3 Hybrid Cars वर मिळतेय जबरदस्त सूट

Shravan 2025: श्रावण महिना सुरु होतोय, सर्व मनोकामना पूर्ण होतील! जाणून घ्या तिथी आणि शुभ योग कोणते?

Foreign Nationals Arrested: डिचोलीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 2 परदेशी महिलांना अटक

SCROLL FOR NEXT