Union Minister Narayan Rane Dainik Gomantak
महाराष्ट्र

नारायण राणेंन बसला 'विजेचा झटका'; प्रविण दरेकर सावध

नारायण राणे हे सध्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये असून ते वेगवेळ्या ठिकाणी जाऊन आशीर्वाद घेता आहेत.

दैनिक गोमन्तक

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना विजेचा झटका बसल्याची माहिती समोर आली आहे. नारायण राणे हे सध्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये असून ते वेगवेळ्या ठिकाणी जाऊन आशीर्वाद घेता आहेत. नारायण राणे हे सध्या कोकणातील कणकवलीमध्ये दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यातील कार्यक्रमात व्यासपीठावर चढत असताना त्यांना हा शॉक लागला आहे. दरम्यान या घटनेत त्यांना कुठलीही दुखापत झालेली नसल्याचे समजते आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सध्या जन आशीर्वाद यात्रा करत असून त्यांचा हा दौरा सुरु झाल्या पासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. नुकताच त्यांनी शिवसेनेवर टीका करताना राज्य सरकार कोरोनाचं कारण सांगुन जन आशीर्वाद यात्रा बंद करण्याला सांगत आहे. तर दुसरीकडे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही बलात्कार होता आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी नारायण राणे यांनी शिवसेनेला इशारा दिला की, 'नारायण राणेच्या मागे लागु नका, मी आता थोडं बोलतोय, मात्र नंतर सगळं बोलेल.' शिवसेनेने केलेल्या गुंड असल्याचा आरोपावर राणे म्हणाले की, "मी जर गुंड होतो, तर मग शिवसेनेने मला मुख्यमंत्री का बनवले? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: स्‍मारक, मंदिरांचा विषय दुर्लक्षितच! सरकारला मिळेना जागा, प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया थंडावली

Mulgaon ESIC hospital: मुळगावात ईएसआय इस्पितळ उभारण्यास तानावडे आग्रही, उत्तर गोव्याच्या विमाधारकांना मिळेल मोठा दिलासा

Goa Comunidade Land: 'कोमुनिदादवरील घरे कायदेशीर'चे ते विधेयक तत्काळ रद्द करा! आमदार व्हिएगश यांची राज्‍यपालांकडे मागणी

Sachin Tendulkar In Goa: 'क्रिकेटचा देव' गोव्यात! काणकोण येथील 'क्रीडा आंगण' सभागृहाचं सचिनच्या हस्ते होणार उद्घाटन

CM Rekha Gupta Attacked: दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला, जनता दरबार सुरु असताना घडला प्रकार; आरोपी ताब्यात

SCROLL FOR NEXT