केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान, ते पुण्यातील (pune) केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या (CFSL) नवीन इमारतीचे उद्घाटन करतील आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) जवानांशी संवाद साधतील.
त्यांच्या दौऱ्यादरम्यान, गृहमंत्री अमित शाह पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या दीक्षांत समारंभाला आणि मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) च्या राष्ट्रीय पुरस्कार समारंभालाही उपस्थित राहणार आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 18 डिसेंबर रोजी गृहमंत्री अहमदनगरमधील शिर्डी (Shirdi) मंदिराला भेट देणार आहेत.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) म्हणाले की, कोणीही सहकाराला द्वितीय श्रेणी मानू शकणार नाही. सहकार भारतीच्या सातव्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन केल्यानंतर आपल्या भाषणात शाह म्हणाले की, आता कोणीही सहकाराला द्वितीय दर्जाच्या नागरिकाप्रमाणे वागणूक देऊ शकणार नाही, याची मी खात्री देतो.
प्रत्येक देशाचा सर्वांगीण विकास साम्यवादी तत्त्वांनी होऊ शकत नाही, सहकार हे मोठे माध्यम असून हे मॉडेल पुढे न्यायचे आहे, असे ते म्हणाले. आगामी काळात देशाच्या विकासात सहकाराचा मोठा हातभार लागणार असून, सर्वात लहान व्यक्तीचे उत्पन्न वाढवून त्याला सन्मान देण्याचे काम सहकार हाच एकमेव मार्ग आहे, असे शाह म्हणाले. प्रत्येक व्यक्तीने आर्थिक विकासात हातभार लावावा आणि त्याचा लाभ घ्यावा, हे सहकार्याशिवाय शक्य नाही, असे ते म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.