Uddhav Thackeray

 
Dainik Gomantak
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीवर सस्पेंस, राज्याची कमान मुलाकडे सोपवा; भाजपचा सल्ला

संजय राऊत यांनीही या वादात उडी घेत भाजपने मुख्यमंत्र्यांची फारशी काळजी करू नये, मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीकय

दैनिक गोमन्तक

10 नोव्हेंबरपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजकीय व्यासपीठावर दिसले नाहीत. त्याच दिवशी त्यांना हरकिशन दास हॉस्पिटलमध्ये सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिसच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांना 2 डिसेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात आला, दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत निवेदन का जारी करण्यात आले नाही, याबाबत विरोधकांनी राज्य सरकारला घेरले आहे. यापूर्वी भाजपा नेते अमित शहा मुंबईत आले होते तेव्हा त्यांनीही उद्धव ठाकरे 'बेपत्ता' असल्याचे सांगत खरपूस समाचार घेतला होता. मात्र ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याचा दावाही त्यांनी केला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रकृतीवरून महाराष्ट्रात राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. त्यांची तब्येत बरी नाही, त्यांनी आपले पद सोडून दुसऱ्या मंत्र्याकडे सोपवावे, असे भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवावं असंही चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले आहेत. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर आता आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची प्रकृती ठीक असल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही या वादात उडी घेत भाजपने मुख्यमंत्र्यांची फारशी काळजी करू नये, मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीकय असे थेट सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

Ponda Water Problems: फोंड्यात 15 दिवसांत पुरेसे पाणी मिळणार? जनता दरबारात सुभाष शिरोडकरांचा शब्द

Gold Mine Accident: "मदतीसाठी आक्रोश अन् चिखलाने माखलेले मृतदेह!" सोन्याची खाण ठरली मृत्यूचा सापळा; 30 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT