Narendra Modi And Uddhav Thackeray.jpg
Narendra Modi And Uddhav Thackeray.jpg 
महाराष्ट्र

"आम्ही जमिनीवरुन परिस्थितीची पाहणी केली, हेलिकॉप्टरमध्ये बसून फोटो नाही काढले"

दैनिक गोमंतक

महाराष्ट्रातील (Maharashtra) कोकण (Konkan) किणार पट्टीला (Coast) मागील आठवड्यात आलेल्या तौक्ते (Tauktae) चक्रीवादळाचा (Cylone) मोठा फटका बसला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Chief Minister) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याच नुकसानग्रस्त भागात दौरा करुन परीस्थीचा आढावा घेतला. या दौऱ्यावर महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी टीका केली. तेव्हा भाजपच्या (Bjp) टीकेला उत्तर देताना केला उद्धव ठाकरेंनी "आम्ही हेलिकॉप्टर मधून नाही तर, जमीनीवरून  रिस्थीतीची पाहणी केली" असे म्हणत अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यवर निशाणा साधला आहे. (Uddhav Thackeray criticized Narendra Modis air tour in gujrat)

कोकणात झालेल्या नुकसानिची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पाहणी दौरा केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून अधिकाऱ्यांना नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या दौऱ्यावर राज्यातील भारतीय जनता पक्षाने जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी फक्त तीन तासांत कोकण दौरा उरकला याचे आश्चर्य वाटते अशा शब्दांत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. तर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर टीका केली. 

भारतीय जनता पक्षाने केलेल्या या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी "मेनी आहे आपला दौरा ३-४ तसंच होता, मात्र किमान आम्ही जमिनीवरून परिस्थितीची पाहणी केली, ना की फोटो काढण्यासाठी हेलिकॉप्टरमधून गेलो" असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हवाई दौऱ्यावर टीका केल्याचे पाहायला मिळाले. तसेच आपण विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी इथे आलेलो नाही असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच गुजरातच्या नुकसानग्रस्त भागात दौरा करून, १००० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT