Bribe Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sindhudurg Crime : बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची दिली धमकी; पोलिस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

सिंधुदुर्ग एलसीबीची कारवाई

Rajat Sawant

सिंधुदुर्गात लाच लुचपत विभागाच्या पथकाने पोलीस उपनिरिक्षकासह हवालदाराला रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास केली. लाचलुचपच्या पथकाने सापळा रचत त्या दोघांना 20 हजार रुपयाची रोख रक्‍कम घेताना पकडले आहे.

दरम्यान, या कारवाईनंतर त्या दोघांच्या घरावर लाचलुचपतच्या पथकाने छापा टाकला असून त्यांच्या मालमत्तेसह कागदपत्रांची चौकशी सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, याप्रकरणी तक्रार देणाऱ्या तक्रारदाराला तुझ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी देऊन, असे सांगून या दोघांनी त्यांच्याकडे 40 हजार रुपयाची मागणी केली होती. त्यातील 20 हजार रुपये आज देण्याचे ठरले होते.

त्यानुसार तक्रारदाराने सिंधुदुर्ग लाच लुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. दरम्यान ठरल्यानुसार लाचलुचपच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचला व त्या दोघांना 20 हजार रुपयांची रोख रक्‍कम घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वैभववाडी येथे करण्यात आली.

लाच स्वीकारल्याप्रकरणी वैभववाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरज पाटील व हवालदार मारुती साखरे या दोघांना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

याप्रकरणी वैभववाडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईनंतर त्या दोघांच्या घरावर लाचलुचपतच्या पथकाने छापा टाकला असून त्यांच्या मालमत्तेसह कागदपत्रांची चौकशी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT