Arrested
Arrested  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Airport वर कोट्यवधींचे हेरॉईन अन् कोकेन जप्त, दोन प्रवाशांना अटक

दैनिक गोमन्तक

Mumbai Airport: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी 47 कोटी रुपयांच्या कथित हेरॉईन आणि कोकेनसह दोघांना अटक करण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई विमानतळ सीमा शुल्क विभागीय युनिट 3 मधील कारवाईत 31.29 कोटी रुपयांचे 4.47 किलो हेरॉईन आणि 15.96 कोटी रुपयांचे 1.596 किलो कोकेन जप्त करण्यात आले.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथून केनियातील नैरोबीमार्गे केनिया एअरवेजच्या विमानाने मुंबईत (Mumbai) उतरताना एका व्यक्तीला 4.47 किलो हेरॉईनसह पकडण्यात आले, असे त्यांनी सांगितले. त्याने 12 डॉक्युमेंट फोल्डरमध्ये काही वस्तू लपवून ठेवल्या होत्या.

तसेच, इथियोपियन एअरलाइन्सच्या फ्लाइटमधून आलेल्या एका व्यक्तीला त्याच्या सामानाच्या स्कॅनमध्ये संशयास्पद बटणे दिसल्यानंतर पकडण्यात आले.

तीन अंमली पदार्थ तस्करांना अटक

महाराष्ट्रातील अ‍ॅंटी नारकोटिक्स सेलने अंबरनाथ परिसरातून तीन अमली पदार्थ तस्करांना अटक (Arrested) करुन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 17 लाख रुपये किमतीचा 90 किलो गांजा जप्त केला. या तिघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assagao Demolition: रमजानच्या दिवशी दोनापावल येथे शिजला घर पाडण्याचा कट, पूजा शर्माची अटक टाळण्यासाठी धडपड

Colva Police: सतावणूक केली, शंभर डॉलरही घेतले; कोलवाच्या 'त्या' PSI विरोधात आणखी एका महिलेची तक्रार

Goa Accident: अपघात नव्हे घातपात! कन्‍हैया कुमारच्या शरीरावर आढळल्या वाराचे निशाण, फोंडा पोलिस संशयाच्‍या घेऱ्यात

Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीत का गेले होते? बदलीबाबत हालचालींना वेग

कोणत्याही क्षणी येणार आदेश, Goa DGP जसपाल सिंग तातडीने दिल्लीला रवाना

SCROLL FOR NEXT