Women Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Local: दोन महिलांमध्ये हाणामारी, केस ओढले... थप्पड मारली; Video Viral

Mumbai Local Video: रोड्स ऑफ मुंबई पेजने 31 सेकंदांचा हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

दैनिक गोमन्तक

Mumbai Local Fight Viral Video: मुंबईतील लोकल ट्रेनच्या लेडीज कोचमध्ये तीन महिलांमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रोड्स ऑफ मुंबई पेजने 31 सेकंदांचा हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ 5 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून 840 हून अधिक लोकांनी तो रिट्विट केला आहे.

भयंकर भांडण

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रवाशांनी भरलेल्या बोगीमध्ये तीन महिला भांडताना आणि एकमेकांचे केस ओढताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक मुलगी रागावून एका महिलेशी गैरवर्तन करते. त्यानंतर तिला मारायला लागते. यादरम्यान तिसरी महिला मुलीला मारहाण करण्यास सुरुवात करते.

व्हिडिओ व्हायरल होत आहे

ट्रेनमधील (Train) इतर महिला प्रवासी भांडण सोडवण्यासाठी येतात, पण त्यांचं भांडण थांबत नाही. एक महिला प्रवाशी 'चला आंटी!' असे म्हणताना ऐकू येते... भांडणाच्या वेळी, इतर महिला स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांच्या जागेवरुन उठतात. त्याचवेळी काही प्रवासी त्यांच्या भांडणाचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात करतात. काही वेळानंतर त्यांचे भांडण थांबते.

रेल्वेकडून कारवाईची मागणी

सोशल मीडिया (Social Media) यूजर्संनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. एका व्यक्तीने लिहिले की, हे सुसंस्कृत समाजात शोभत नाही. यावर रेल्वे प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी अनेकांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी असचा महिलांच्या (Women) भांडणाचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये महिला एकमेकांना मारहाण करताना आणि केस ओढताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT