Pune Solapur Highway Accident Dainik Gomantak
महाराष्ट्र

Pune Solapur Highway Accident: पुणे सोलापूर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात, एक ठार

दोन भरधाव कंटेनर एकमेकांना धडकले आहेत.

Pramod Yadav

पुणे सोलापूर मार्गावर (Pune Solapur Highway Accident) आज पहाटे विचित्र अपघात झाला असून, दोन भरधाव कंटेनर एकमेकांना धडकले आहेत. यानंतर शेजारीच असलेल्या एका कार आणि काही वाहनांना हे कंटेनर धडकले. या अपघातात एक नागरिक ठार झाला आहे.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत आज पहाटे 05 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचं नाव समजू शकले नसून या अपघातात तीनही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर मार्गावर (Pune Solapur Highway Accident) पहाटे 05 च्या सुमारास एक कंटेनर पुण्याच्या दिशेने येत होता. त्चयावेळी मागून येणाऱ्या आणखी एका भरधाव कंटेनरने पाठीमागून जोडरदार धडक दिली. यावेळी चौकात उभ्या असलेल्या एका कारला जाऊन हा कंटेनर धडकला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेतील जखमी नागरिकांना तातडीने रुग्णवाहिकेतून उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

अपघात होताच उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. जखमींना तात्काळ उपचारासाठी उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात झालेल्या ठिकाणी वाहने व वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. व वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघातात अनेक वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT