कोकण रेल्वे   Dainik Gomantak
महाराष्ट्र

कोकण-रेल्वे मार्गावरील वाहतुक 6 तासांत पुन्हा सुरु

अधिकारी आणि कामगारांनी कौतुकास्पद कामगिरी करत ६ तासानंतर या मार्गावरील राजधानी एक्सप्रेसचे घसरलेले इंजिन पुन्हा मार्गस्थ केले आहे.

दैनिक गोमन्तक

रत्नागिरी : कोकण- रेल्वे (Konkan Railway) मार्गावर राजधानी एक्स्प्रेसच्या (Rajdhani Express) इंजिनचे चाक घसल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या मार्गावर कोकण रेल्वे मार्गावरील अपत्कालीन यंत्रणा (Emergency system) घटनास्थळी दाखल होऊन अधिकारी आणि कामगारांनी ६ तासानंतर या मार्गावरील राजधानी एक्सप्रेसचे घसरलेले इंजिन पुन्हा मार्गस्थ केले आहे. अधिकारी आणि कामगारांनी इतक्या कमी वेळेत केलेली ही कामगिरी कौतुकास्पद आहे.

दरम्यान, राजधानी एक्स्प्रेसच्या इंजिनचे चाक रुळावरुन घसरल्याने, कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. कोकण रेल्वेच्या भोके ते उक्षी मार्गावर बोल्डर रूळावर पडल्याने राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनचं एक चाक रूळावरून घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक थांबली आहे. ही घटना आज पहाटे सव्वा चारच्या सुमारास घडली. हजरत निजामुद्दीन ते मडगाव या मार्गे ही ट्रेन धावत होती. या घटनेची माहिती मिळताच कोकण रेल्वेची आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी तात्काळ रवाना झाली आहे आणि इंजिन पुन्हा मार्गावर आणण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावरून जाणाऱ्या विविध गाड्या मार्गावरील स्थानकात थांबिवण्यात आल्या होत्या. सुदैवाने या घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही.

या आपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान रत्नागिरी स्थानकात कोचीवली एक्सप्रेस, भोके येथे सीएसटीएम कडे जाणारी एक्सप्रेस, चिपळूणला नागकोईल एक्सप्रेस, दिवा सावंतवाडी एक्स्प्रेस खेडला तर मंगला एक्सप्रेस वैभवावाडीला थांबवून ठेवण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Watch Video: "लड़कियों के हाथों में मजा बहुत है, वो...", पाकिस्तान महिला संघाच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं वादग्रस्त विधान Viral

Yashasvi Jaiswal: शुभमन गिलनंतर आता यशस्वी जैस्वालचाही 'कॅप्टन'पदावर डोळा; म्हणाला, "मला पण कर्णधार बनायचयं!"

Suleman Siddiquie: जमीन हडप प्रकरणी सुलेमानला पुन्हा आणले गोव्यात! न्यायालयाचे निर्देश; 8 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी

Nobel Prize: 2025 वर्षाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल मेरी ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुशी यांना जाहीर

"गोव्यात सुविधांचा आनंद घ्या, दिल्लीत तुम्ही हे करू शकला नाहीत", केजरीवालांना भाजपचा टोला; Post Viral

SCROLL FOR NEXT