Accident  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Tillari Ghat: तिलारी घाटात भीषण अपघात; ब्रेक फेल झाल्याने आयशर टेम्पो 100 फूट दरीत कोसळला, दोघे जखमी

Tillari Ghat Accident: अपघातात दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी चंदगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

सिंधुदुर्ग: धोकादायक तिलारी घाटात भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने आयशर टेम्पो १०० फूट खोल दरीत कोसळला. यात ट्रकचा चक्काचूर झाला असून, दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी चंदगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी (२८ जून) दुपारी हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो बेळगाव येथून दोडामार्गच्या दिशेने जात होता. यावेळी तिलारी घाटात टेम्पोचा अचानक ब्रेक फेल झाल्याने टेम्पो थेट १०० फूट खोल दरीत कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहाणी झालेली नाही पण, दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी चंदगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रकमध्ये अडकलेल्या दोन कर्मचाऱ्यांना सुखरुपपणे बाहेर काढले.

दरम्यान, तिलारी घाट वाहतूकीसाठी धोकादायक मानला जातो. तीव्र उतार आणि वळण यामुळे या घाटातून वाहतूक जोखमीची असते. शिवाय पावसाळ्यात हा धोका अधिक वाढतो. यापूर्वी देखील घाटात अपघाताच्या घटना घडल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT