Crime  Dainik Gomantak
महाराष्ट्र

रत्नागिरीत एकाच घरात तीन महिलांचा मृत्यू

रत्नागिरीतील दापोली तालुक्यात तीन वृद्ध महिलांची हत्या झाल्याचे समोर आले आहे.

दैनिक गोमन्तक

रत्नागितील (Ratnagiri) वनौशी येथील तुईन महिलांचा खून करण्यात आला आहे असे उघडकीस आले आहे. या हत्याकांडामागे असलेले धक्कादायक कारण समोर आले आहे. दगिन्यांसाठी हा खून करण्यात आला आहे असे पोलिस तपासात समजले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागितील नागरिक या घटनेमुळे हादरले आहेत. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी पोलिस ठण्यात तक्रार नोंदवली. वणौशी खोटवाडी येथे 14 जानेवारीला ही घटना समोर आली. तपासणीसाठी पोलिस अधिकारी शशीकिरण काशीद यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पाठक शनिवारपासून गावात तळ ठिकून होते. या महिलांची हत्या ओळखीतल्याच व्यक्तीने केला असल्याचा आंदज व्यक्त होत आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत चौकशी करण्यात आली परंतु पोलिसांना ठोस माहिती अद्याप मिळालेली नव्हती.

तिन्ही महिलांचे (Women) मृतदेह विच्छेदनासाठी रत्नागिरीला पाठवण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी हे मृतदेह पोलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिले. शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर काही गोष्टी समोर आल्या आहेत. सत्यवती पाटणे, पार्वती पाटणे व रुक्मिणी पाटणे यांच्याकडील दागिने चोरल्यानंतर डोक्यावर हल्ला करून पुरावा नष्ट करण्यासाठी जाळण्याचा प्रयत्न झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पैसे (Money) आणि दागिन्यांच्या लालचेपोटी अज्ञाताने या महिलांचा खून केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दापोली पोलिसांनी या घटणेबाबत गुन्हा दाखल केला आहे. या महिला जवळील 1 लाख 62 हजार 150 रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत असि माहिती मिळाली आहे. या तिन्ही महिला मृताअवस्थेत वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्या.या घरचा दरवाजा आतल्या बाजूने बंद होता. या घटनेचा आधिक तपास पोलिस अधिकारी शशीकिरण काशिद करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT