Mumbai Cordelia Cruise Drugs Case Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai to Goa Cruise: या सेंट्रल फोर्सने दिली होती NCB ला ड्रग्स पार्टीबद्दल माहिती

क्रूझवर रंगलेल्या ड्रग्स पार्टी वर धाड टाकतांना NCB पुढे होते या तीन समस्यांचे आवाहन

दैनिक गोमन्तक

शनिवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने मुंबईहून गोव्याकडे (Mumbai to Goa) जाणाऱ्या एका आलिशान क्रूझवर (Cordelia Cruise) छापा टाकला आणि तेथून अंमली पदार्थ (Drugs) जप्त केले. एवढेच नाही तर या दरम्यान 8 लोकांना चौकशीसाठी ताब्यातही घेण्यात आले, त्यानंतर दीर्घ चौकशीनंतर तीन लोकांना अटक करण्यात आली.

या तिघांमध्ये बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश आहे. क्रूजवरील ड्रग्ज पार्टीची माहिती NCB ला कोणत्याही माहितीदाराकडून प्राप्त झाली नव्हती, तर हि माहीती सीआयएसएफकडून (CISF) कडून NCB ला मिळाली होती. त्या माहितीनंतर एनसीबीने हा छापा टाकण्याची संपूर्ण योजना आखली होती.

या हायप्रोफाईल प्रकरणाची स्क्रिप्ट गेल्या महिन्यापासून लिहिली जात होती. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मुंबई इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनलच्या सुरक्षेसाठी जबाबदार आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सीआयएसएफ युनिटला एक गुप्त माहिती मिळाली होती. मुंबईहून गोवा जाणाऱ्या क्रूझमध्ये मिड-सी पार्टी आयोजित केली जाणार आहे. आणि त्या पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर होणार आहे. अशी ती माहिती होती.

सीआयएसएफला ही माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी थेट ही माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीला दिली. सीआयएसएफकडे असलेली संपूर्ण माहिती अशी होती की मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझमध्ये मनोरंजन, टीव्ही चॅनल, फॅशन क्षेत्रातल्या लोकांनी या पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीचे नाव क्रे आर्क ठेवण्यात आले होते.

2 ऑक्टोबर रोजी ही क्रूझ मुंबई बंदरातून गोव्याला दुपारी 4 वाजता रवाना होणार होती. आणि 4 ऑक्टोबर रोजी सकाळी मुंबईला परत येणार होती. समुद्रावरील या दोन दिवसीय पार्टीदरम्यान, क्रूझवर अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले होते. देश -विदेशातील अनेक प्रसिद्ध डीजे या पार्टीमध्ये सहभागी झाले होते. विविध प्रकारचे संगीत कार्यक्रम होणार होते आणि विशेष पाहुण्यांसाठी एक विशेष पार्टी देखील आयोजित केली गेली होती. मुंबई ते गोवा या बीट क्रूझवर होणाऱ्या या मिड-सी पार्टीसाठी ऑनलाईन तिकिटे उपलब्ध होती. दोन रात्री आणि दोन दिवसांच्या या टूर पॅकेजचे सर्वात स्वस्त तिकीट 80 हजार रुपयांचे होते. या क्रूझवर एका वेळी सुमारे 1800 प्रवासी प्रवास करू शकतात.

सीआयएसएफला मिळालेल्या माहितीनुसार, या पार्टीतील काही लोक ड्रग्जचा वापर करणार होते. मात्र ते लोक कोण असमआर याची माहिती NCB ला नव्हती. मात्र पार्टीची माहिती मिळताच NCB टीम कारवाईला लागली. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी स्वतः या ऑपरेशनचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली. योगायोगाने, बॅलार्ड पियर रोडवर मुंबई मध्ये ज्या ठिकाणी NCB चे ऑफीस आहे त्या ठिकाणाहून इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. जिथून सर्व क्रूझ निघतात. एनसीबीच्या टीमने प्रथम क्रे आर्क नावाच्या कार्यक्रमाची चौकशी सुरू केली, जी दिल्लीस्थित कंपनीने आयोजित केली होती. या दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसमोर तीन प्रकारच्या समस्या होत्या.

  • NCB ची पहिली अडचण अशी होती की, क्रूझवर सुमारे 1800 लोक असतील. आता अशा परिस्थितीत एकाच क्रूझवर इतक्या लोकांना कसे शोधावे?

  • दुसरी समस्या म्हणजे क्रूझला एनसीबी अधिकारी म्हणून जाता येणार नाही. अन्यथा सर्व गेस्ट आधीच सतर्क झाले असते.

  • तिसरी अडचण अशी होती की जर NCB ने मुंबई बंदरावर क्रूझ सोडण्यापूर्वी आपले ऑपरेशन सुरू केले असते तर कोणालाही रंगेहाथ पकडता आले नसते.

म्हणूनच, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ठरवले की ते त्यांचे ऑपरेशन मध्य-समुद्रात म्हणजेच समुद्राच्या मध्यभागी करतील. एनसीबीने आतापर्यंत सर्वत्र छापे टाकले आहेत. परंतु NCB प्रथमच हे ऑपरेशन समुद्राच्या मध्यभागी केले आहे. पण या ऑपरेशनसाठी आधी त्या क्रूझवर जाणे आवश्यक होते. कारण तेथूनच NCB चे नियोजन सुरू होणार होते. NCB संघाने प्रथम त्या क्रूझवर आयोजित केलेल्या पार्टीसाठी काही तिकिटे खरेदी केली. नियोजनानुसार, अनेक NCB अधिकारी प्रवासी बनले आणि त्या क्रूझवर चढले. मुंबई इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनलवरून क्रूझ वेळेवर गोव्याला रवाना झाली. क्रूझचा वेग जसजसा वाढत होता. तसे, पार्टीसाठी आलेल्या लोकांचा उत्साह वाढत होता. जेव्हा क्रूझ समुद्राच्या मध्यभागी पोहोचली तेव्हा अचानक NCB च्या अधिकाऱ्यांनी पार्टीवर छापा टाकण्यास सुरुवात केली. आणि सर्व लोकांना घेरून शोध घेतला गेला.

सीआयएसएफ कडून मिळालेली माहिती पूर्णपणे अचूक आहे. गोव्याला जाणाऱ्या जहाजावर एक हायप्रोफाईल ड्रग पार्टी आयोजित केली जात होती. एससीबीच्या टीमने कोकेन, चरस, एमडीसह मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पार्टीतून जप्त केले. Cordelia नावाच्या त्या क्रूझवर NCB चा हा हल्ला 7 तास चालला. या दरम्यान अनेक लोकांना ताब्यात घेण्यात आले. ज्यात किंग खानचा मुलगा आर्यन खान देखील सहभागी होता. सर्व लोकांना रविवारी मुंबईत आणण्यात आले. जिथे 8 लोकांची बराच वेळ चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर आर्यन खानसह 3 लोकांना अटक करण्यात आली. या प्रकरणात एनसीबीने ज्या आठ जणांना ताब्यात घेतले त्यांच्यामध्ये आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत चोकर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना दीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सतत धक्कादायक खुलासे होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT