Thief Dainik Gomantak
महाराष्ट्र

चोराचं फिरलं डोकं अन् लिहीली मालकाला चिठ्ठी

चोरट्याच्या अव्वल दर्जाच्या कृतीमुळे पोलिसांनीही लावला डोक्याला हात.

दैनिक गोमन्तक

नागपूर (Nagpur) शहरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीची एक विचित्र घटना घडली आहे, याठिकाणी एका चोरट्याने घरफोडी केल्यानंतर घरात काहीच न मिळाल्याने, रागाच्या भरात मालकासाठी एक चिठ्ठी त्याने लिहिली आहे. भामट्याचं कृत्य पाहून पोलिसांनी देखील डोक्याला हात लावला. या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास चालू आहे. (The thief got angry and wrote a letter to the owner)

नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीची एक घटना घडली. पण चोरट्याला (Thief) घरात काहीच मुद्देमाल न सापडल्यानं त्यानं घरातून निघते वेळी घरमालकाला उद्देशून कागदावर एक मेसेज लिहिला. संबंधित चिठ्ठीत त्यानं घरातून कोणताही मुद्देमाल चोरीला गेला नाही असं लिहीलेलं आहे. शिवाय संबंधित चिठ्ठीत त्यानं घरमालकाला 'भिकारी' देखील म्हटलं.

Thief

घटनास्थळी ही चिठ्ठी आढळल्यानंतर पोलिसांनी देखील डोक्याला हात लावला आहे. चोरट्याची ही चिठ्ठी सध्या सोशल मीडियात (Social Media) चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. तसेच अनेकजणांनी यावरती मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे घरात चोरी झाली असून तीन हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद घरमालकाने दिली. या प्रकरणी पोलिसांनी (Police) अज्ञात चोरट्याविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. हुडकेश्वर पोलीस आरोपी चोरट्याचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT