Raosaheb Danve Dainik Gomantak 0.qsd0
महाराष्ट्र

कोळशाचा पुरवठा थांबवण्याचे केंद्राला राज्यानेच सांगितले! केंद्रीय राज्यमंत्री दानवे

दैनिक गोमन्तक

मोदी सरकारने (Modi government) कोळशाची मागणी नोंदविण्यासाठी सर्व राज्यांना पत्र पाठविले होते. मात्र मार्च-एप्रिल महिन्यामध्ये ठाकरे सरकारने (Thackeray government) केंद्राला पत्र पाठवून राज्याला होणारा कोळशाचा पुरवठा थांबवा, आम्ही आता कोळसा घेऊ शकत नाहीत, असे स्पष्टपणे कळविले होते, असे भाजप नेते आणि केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्र सरकराकडून कोळशाचा पुरवठा करण्यात येत नसल्याच्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केलेल्या आरोपाचा संदर्भ देत दानवे यांनी म्हटले की, मार्च-एप्रिल महिन्यांपासून भारत सरकारने राज्य सरकारला पावसाळा सुरु होण्यापूर्वी कोळशाचा साठा करण्यास कळविण्यात आले होते. मात्र महाराष्ट्र सरकारने कोळशाचा साठा करण्यास नकार दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दुसरीकडे भारत सरकारवर आरोप करत मायबाप जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसऱ्या राज्यामधून वीज घेण्यामध्ये ठाकरे सरकार अथवा त्यांच्या मंत्र्यांचा फायदा होत असेल तर काही सांगता येत नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. ऐन पावसाळ्यात कोळसा खाणीमध्ये समस्या निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोळशाच्या दळवळणामध्ये अडचणी येतात. त्यामुळे पावसाळ्याच्यापूर्वीच आवश्यक तेवढा साठा करण्यास भारत सरकारने राज्यांना कळविले होते. मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले. दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांमध्ये विजेची कमालीची मागणी वाढते. त्यासाठी महाराष्ट्र सरकारे नियोजन केले पाहिजे.

तसेच, देशामध्ये 40 मेट्रीक टन कोळसा भांडारामध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर कोळसा खाणींच्या केंद्रावरती सुमारे सात लाख मेट्रीक टन आणखी कोळशाचा साठा उपलब्ध आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतरही कामगार आणि अधिकाऱ्यांनी जोखीम पत्करुन पूर्वीपेक्षा अधिक कोळशाचे उत्पादन केले असल्याचेही यावेळी दानवे यांनी बोलताना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT