Petrol Pump Dainik Gomantak
महाराष्ट्र

ठाकरे सरकारचा जनतेला दिलासा, पेट्रोल-डिझेलचे दर केले कमी

महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

Maharashtra Petrol Diesel Price : मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये कपात केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारनेही राज्यातील जनतेला दिलासा दिला आहे. पेट्रोलच्या दरात 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलच्या दरात 1 रुपये 44 पैशांची कपात करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. तत्पूर्वी मोदी सरकारने पेट्रोलच्या दरात 8 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 6 रुपयाने कपात करण्याता निर्णय घेतला होता.

दरम्यान, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel) दरात मोठी कपात (Petrol Diesel Reduced Price) करण्याची घोषणा काल केली. ही वजावट सेंट्रल एक्साइज ड्युटीच्या माध्यमातून केली जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सांगितले की, 'आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत.' यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या इंधन दरांवरुन विरोधक केंद्र सरकारवर हल्लाबोल करत होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यासाठी विरोधक सरकारवर सातत्याने दबाव आणत होते.

तसेच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आणखी एक मोठी घोषणा करुन जनतेला दिलासा दिला आहे. त्या म्हणाल्या की, 'यावर्षी केंद्र सरकार (Central Government) प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलिंडर 200 रुपये सबसिडी देणार आहे. ही सबसिडी फक्त 12 सिलिंडरपर्यंतच दिली जाईल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa CM Meet Fadanvis: मुख्यमंत्री सावंतांनी गळाभेट घेऊन फडणवीसांना दिल्या विजयाच्या शुभेच्छा

IFFI Goa 2024: चित्रपट महोत्सवाला तुडुंब गर्दी; मात्र फोंड्याच्या ‘मूव्ही मॅजिकला’ अजूनही प्रेक्षक मिळेना

Saint Francis Xavier School: संत फ्रान्सिस झेवियर विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस, धबधब्यावर विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याचा ठपका

Goa Live News Today: माजी सरपंच प्रशांत नाईकांकडून प्राथमिक शाळेला लाकडी बाक प्रदान

Miraai Project Goa: पडून असणाऱ्या स्क्रॅप वाहनांची समस्या संपणार! ‘मिराई’ प्रकल्पाचे मडकईत उद्‍घाटन; आमदार कामत यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT