Weather Update Dainik Gomantak
महाराष्ट्र

Weather Update: महाराष्ट्रासह उत्तर भारतात पडणार मुसळधार पाऊस

हरियाणा (Haryana) तसेच महाराष्ट्र (Maharashtra), गुजरातमधील काही प्रदेशांमध्ये (Gujarat Ara) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील अनेक राज्यांमधील हवामानात वेगाने बदल होत आहे. पुन्हा एकदा वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाला आहे. (Delhi), पश्चिम उत्तर प्रदेश (West UP), पंजाब (Punjab), चंदीगड (Chandigarh), हरियाणा (Haryana), महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरातमधील काही प्रदेशांमध्ये (Gujarat Ara) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (The meteorological department has forecast heavy rains in Maharashtra and northern India)

याशिवाय आरा, पूर्व राजस्थान (East Rajasthan) आणि पश्चिम मध्य प्रदेशात (West Madhya Pradesh) पावसाची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार 7 ते 10 मार्च दरम्यान या राज्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे.

त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात 8 आणि 9 मार्च रोजी गारपीट होण्याची शक्यता आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये आजपासून 9 मार्चपर्यंत पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. पुढील 24 तासांत उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.

तसेच, पुढील 24 तासांत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सध्या दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरावरील डीप डिप्रेशन 5 मार्चच्या रात्री कमकुवत होऊन कमी झाले आहे. आता ते नैऋत्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र म्हणून पाहिले जात आहे, जे आग्नेय दिशेने तामिळनाडू किनारपट्टीकडे सरकत आहे.

शिवाय, वेस्टर्न डिस्टर्बन्स जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या लगतच्या भागांवर आहे. ८ मार्चपासून पश्चिम हिमालयावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. याशिवाय बिहार, झारखंड आणि छत्तीसगडमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. स्वच्छ हवामान आणि कडक सूर्यप्रकाशामुळे या राज्यांमध्ये उष्णता वाढत आहे. पुढील आठवड्यापासून या सर्व राज्यांमध्ये तापमानात आणखी वाढ होणार असून, उष्णतेचा प्रकोपही दिसून येईल, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT