Aurangabad Crime News Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुख्याध्यापिकेनेच केली विद्यार्थ्याला मारहाण; नेमकं काय आहे प्रकरण?

या घटनेबाबत मुलाच्या आईने मुख्याध्यापिके विरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली आहे.

दैनिक गोमन्तक

Aurangabad Crime News: शाळा हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण करू नये असा शासनाचा आदेश आहे. परंतु ज्युनियर केजीमध्ये शिकणाऱ्या चार वर्षीय मुलाला मुख्याध्यापिकेनेच (Headmistress) किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची घटना औरंगाबाद येथे घडली आहे. या घटनेबाबत मुलाच्या आईने मुख्याध्यापिके विरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली आहे.

सिडको पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर घटना सिडको एन-9 येथील रघुनंदन विद्यालयातील आहे. मुख्याध्यापिका शुभांगी जोशी यांना मुलाचा धक्का लागल्यामुळे त्यांनी मुलाला रागवले आणि मारहाणही केल्याचा आरोप आईने केला आहे. मात्र

दरम्यान, मुख्याध्यापिका शुभांगी जोशी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. वर्गात मुलांची भांडणं सुरु होती, ती सोडवण्यासाठी मी गेले होते. त्यानंतर विराजने स्वतःलाच मारून घेत रडणे सुरु केले आमि घरी जाऊन मी मारले अशी तक्रार पालकांकडे केली, असं स्पष्टीकरण मुख्याध्यापिकेने दिले आहे. तसेच आजपर्यंत मी कुणालाही मारले नाही. कोणत्या मुलाला हातही लावलेला नाही. राजकीय उद्देशाने प्रेरित होऊन ही तक्रार करण्यात आली आहे. उलट गेल्या चार वर्षआंपासून आम्हाला त्रास होत आहे. महामुनी यांनी त्यांच्या मुलाची फीदेखील भरली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याशिवाय इतर मुलांची फी कमी करण्यासाठी आमच्यावर वारंवार दबाव आणला जात होता, अशी तक्रार मुख्याध्यापिकेने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT