coronavirus Dainik Gomantak
महाराष्ट्र

ओमायक्रॉनची महाराष्ट्रात एन्ट्री!

ओमायक्रॉनची बाधित पहिला रुग्ण महाराष्ट्रात आढळला आहे.

Manish Jadhav

महाराष्ट्रात कोरोनाचा (Corona) संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला असतानाच आता कोरोनाच्या ओमायक्रॉनची एन्ट्री झाली आहे. दक्षिण आफ्रिकेमधून आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची लक्षणे आढळून आली आहेत.

24 नोव्हेंबरला कल्याण-डोंबिवलीमधील तरुणाला सौम्य तापाची लक्षणे जाणवली होती. त्याच्यावर कल्याण डोंबिवलीमधील कोवीड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. याशिवाय 24 नोव्हेंबर दक्षिण आफ्रिकेमधील केपटाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे हा तरुण मुंबईमध्ये दाखल झाला होता. दरम्यान या तरुणामध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची लक्षणे आढळून आली होती. या नव्या विषाणू व्हेरिएंटचा राज्यातील हा पहिलाच रुग्ण आहे.

देशामध्ये ऐकून ओमिक्रॉन व्हेरियंटचे 38 रुग्ण आढळले आहेत. आता भारतात गुजरातमध्ये (Gujarat) ओमिक्रॉन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे. यामुळे आता मोठी खळबळ उडालेली आहे. महाराष्ट्रा शेजारील राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळत असल्याने महाराष्ट्रातील प्रशासन अलर्ट झाले आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये चिंता वाढली आहे. याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात 9 संशयित ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत.

सुखद बाब म्हणजे,. ओमिक्रॉनमुळे आता परंत एकही मृत्यू झाला नाही असे WHO ने स्पष्ट केले आहे. ओमिक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट मात्र येऊ शकते असं भाकीत काहींनी वर्तवले आहे. मुंबईसह महाराष्ट्रात ओमिक्रॉनमुळे प्रशासन सज्ज झाले आहे.

RT-PCR बंधनकारक

त्याचबरोबर देशांतर्गत विमान प्रवासासाठीही राज्य सरकारने प्रवाशांना संपूर्ण कोरोना लसीकरण करणे आवश्यक केले आहे. सर्व प्रवाशांनी बोर्डिंगच्या 72 तास आधी कोरोना निगेटिव्ह RT-PCR रिपोर्ट दाखवणे आवश्यक आहे. त्याच वेळी, लसीकरण प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. जे प्रवासी विमान प्रवासासाठी विमानतळावर या दोन नियमांचे पालन करणार नाहीत त्यांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. केंद्र सरकारचे पत्र आल्यानंतर उद्धव सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: प्रदूषण मंडळाचा दणका! शापोरातील दोन नाईट क्लब सील, ध्वनी मर्यादा मिटर न वापरल्याने कारवाई

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT