Belgavi Border Dispute Dainik Gomantak
महाराष्ट्र

Belgavi Border Dispute : बेळगाव सीमावादावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा गर्भित इशारा, म्हणाले...

हे प्रकरण न्यायालयात आहे, या गोष्टीत त्यांनी हस्तक्षेप करता न करता कायदेशीर लढा दिला पाहिजे- बोम्मई

गोमन्तक डिजिटल टीम

दिवसेंदिवस चिघळत जाणाऱ्या सीमावाद प्रश्नावर बोलण्यासाठी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई हे बेळगाव येथे जाऊन तेथील मराठी बांधवांशी संवाद साधणार म्हणून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांच्या बेळगाव दौऱ्याला विरोध केला होता. तसेच महाराष्ट्राचा एकही नेता बेळगावमध्ये जाऊ नये म्हणून कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कर्नाटक सीमेवर बंदोबस्त ठेवूनही महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कर्नाटकला भेट दिल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे संतप्त झाले. ते म्हणाले की, हे प्रकरण न्यायालयात आहे, या गोष्टीत त्यांनी हस्तक्षेप करता न करता कायदेशीर लढा दिला पाहिजे. या प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे आम्ही आधीच सांगितले आहे. त्यामुळे ही योग्य वेळ नाही. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की हे प्रकरण न्यायालयात आहे आणि कायदेशीररित्या लढा सुरु आहे. त्यांनी संयम ठेवावा.

महाराष्ट्रासोबतच्या सीमावादावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी सांगितले की, आमच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे की, दोन राज्यांमध्ये अशी परिस्थिती असताना महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी यावेळी भेट देऊ नये. आहे. यूपीमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सपाच्या आमदारांनी विधानभवनाच्या आवारात धरणे आंदोलन केले. दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सुरू असलेला सीमावाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या दोन्ही राज्यात भाजपचे सरकार असताना दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री समोरासमोर आहेत. सीमावाद, त्यासंबंधीच्या घटनांमुळे आणि महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई नाराज दिसत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT