<div class="paragraphs"><p>Notice</p></div>

Notice

 

Dainik Gomantak

महाराष्ट्र

Maharashtra: परिवहन मंत्र्यांना मोठा झटका, साई रिसॉर्टला केंद्राने पाठवली नोटीस

दैनिक गोमन्तक

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Minister Anil Parab) यांना केंद्र सरकारच्या (Central Government) पर्यावरण खात्याने दापोलीतील साई रिसॉर्टचे बांधकाम तोडण्याबाबत कारणे दाखवा अशी नोटीस (Notice) बजावली आहे. हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी वेळोवेळी केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतील मुरूड समुद्र किनारी सीआरझेड आणि नो डेव्हलपमेंट झोनमधील साई रिसॉर्ट आणि सी शंख रिसॉर्टची बेकायदेशीर बांधकामे तोडण्यासाठी पर्यावरण खात्याने ही कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. हे रिसॉर्ट जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पाडले जाईल असा दावा भाजप (BJP) नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. केंद्र शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्याने आता पुन्हा या सगळ्या प्रकरणाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

माझ्या तक्रारीवरुनच ही कारवाई केली जात आहे अशी माहितीही सोमय्या यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. अनिल परब आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्याविरोधात माझ्या तक्रारी होत्या. मात्र नार्वेकर यांनी बंगला स्वतःहून पडल्यानंतर तो विषय समाप्त झाला असून आता कथित आरोप असलेले साई रिसॉर्ट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्यावर तब्बल शंभर कोटी रुपयांचा दावा दाखल केला असून आपला या रिसॉर्टशी काडीचाही संबंध नाही असे परब यांनी स्पष्ट केले आहे. या बरोबरच याप्रकरणी माझी खोटी बदनामी करत असल्याने सोमय्या यांनाच शंभर कोटी रुपये मला दयावे लागतील अशी प्रतिक्रिया रत्नागिरी दौऱ्यावेळी अनिल परब यांनी पत्रकारांजवळ बोलताना दिली होती.

भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने ठाकरे सरकारचे मंत्री अनिल परब (Minister Anil Parab) यांनी दापोली येथील मुरुड समुद्र किनाऱ्यावर 2 अनधिकृत रिसॉर्ट बांधले आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील ना विकास क्षेत्र सीआरझेड सीमेच्या आत, साई रिसॉर्ट एन एक्स, गाव मुरुड, दापोली आणि सी कौंच बीच रिसॉर्ट, गाव मुरुड, दापोली हे अनधिकृतरित्या बांधले ते तोडण्यासंबंधीची नोटीस भारत सरकारद्वारे 17 डिसेंबर 2021 रोजी पाठवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

अनिल परब यांना येत्या 15 दिवसात नोटिशीला उत्तर द्यावे लागणार आहे. या सगळ्या विषयाची माहिती शुक्रवारी भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटरद्वारे माहीती दिली आहे. या नोटीशीत 15 दिवसांच्या आत कारणे दाखवा नोटीसचे उत्तर द्यावी अशी सूचना करण्यात आली आहे. गेल्या 2-3 वर्षात हे बांधकाम करण्यात आले. याचे सॅटेलाईट नकाशे व पुरावेही नोटीशीसोबत देण्यात आले आहेत, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी पत्रकारांना दिली आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या (Central Government) पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी जून 2021 मध्ये या दोन्ही अनधिकृत रिसॉर्टची पाहणी केली होती. त्याचा अहवाल केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला (Government of Maharashtra) पाठवला होता. त्या अंतर्गत ही कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हे रिसॉर्ट पाडण्याचे अंतिम आदेश देण्यात येतील, असा विश्वास किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: भारतीय नौदलाच्या विमानाचे दाबोळीवर आपत्कालीन लँडिंग, चार फ्लाईट्स वळवल्या

Pernem News : पेडणे तालुक्यातील रस्त्यांची ‘वाट’; रस्ते पावसाळ्यापूर्वी तरी दुरुस्त होतील का

Goa Today's Live News: कळंगुट येथे टॅक्सी चालकाला पर्यटकांकडून मारहाण

Bicholim Volleyball League : सर्वण येथे व्हॉलिबॉल लीगला सुरवात; आठ संघांचा सहभाग

Goa Traffic Violations: वाहतूक उल्लंघन ; चार महिन्यांत ९ कोटींचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT