'सबका साथ सबका विकास' वाक्य वाजपेयींनाच शोभते, राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

अटलबिहारी वाजपेयी यांच्या 97व्या जयंतीनिमित्त त्यांनी हे वक्तव्य केले.
Sanjay Raut

Sanjay Raut

Dainik Gomantak

अटलबिहारी वाजपेयी हे हिंदुत्ववादी होते, पण ते धर्मांध नव्हते. हा देश सर्वांचा आहे. देशाची एकात्मता राखली पाहिजे. या भावनेने ते कायम पुढे जात राहिले. यामुळेच जनतेने त्यांना एका पक्षाचा नेता नाही तर संपूर्ण देशाचा नेता मानले होते. 'सबका साथ, सबका विकास' हे वाक्य त्यांनाच शोभते. अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतरत्न दिवंगत माजी पंतप्रधान आणि भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण काढली. संजय राऊत शनिवारी मुंबईत माध्यमांशी बोलत होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या 97व्या जयंतीनिमित्त त्यांनी हे वक्तव्य केले.

<div class="paragraphs"><p>Sanjay Raut</p></div>
मुंबईत न्यू इयर सेलिब्रेशन बॅन

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वाजपेयींची तुलना पंडित जवाहरलाल नेहरूंशी (Pandit Jawaharlal Nehru) केली आणि ते म्हणाले की, नेहरूंनंतर खर्‍या अर्थाने वाजपेयीजी होते. एक महान संसदपटू आणि महान माणूस असणे म्हणजे काय असते, हे वाजपेयीजींनी आपल्या आचरणातून आणि कृतीतून दाखवून दिले. हिंदुत्वाच्या विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. 'हिंदू अब तुमको मारेगा नही' असं रणशिंग त्यांनी वाजवलं, पण त्याचा अर्थ 'दुसरा कोणी मारेल' असा नव्हता. हा देश सर्वांचा आहे. देशाची एकता टिकली पाहिजे. ही त्यांची कल्पना होती. धर्मांध न राहता हिंदुत्वाचे राजकारण कसे केले जाते, हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, 'अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) आणि लालकृष्ण अडवाणी (LK Advani) हे भाजपचे दोन प्रमुख आधारस्तंभ होते. शिवसेना-भाजप युती अटलबिहारी वाजपेयींच्या काळात झाली. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा सल्ला घेऊन निर्णय घेत असत. ते संयोजक होते, सर्वांना सोबत घेऊन कसे जायचे हे त्यांना माहीत होते. सध्याच्या काळात त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी अपेक्षा आहे.

<div class="paragraphs"><p>Sanjay Raut</p></div>
महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे आजपासून नाईट कर्फ्यू लागू

ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने नवीन निर्बंध लागू केले आहेत. मात्र यावर राजकारण होत आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, 'देशातील तज्ज्ञ आणि डॉक्टर ओमिक्रॉनच्या धोक्यांबाबत सतत इशारा देत आहेत. मात्र भाजप नेत्यांना हे समजत नाही. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनीही या विषयावर आरोग्य विभागासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. तसेच कोरोनाच्या प्रसाराबाबत चिंता व्यक्त केली. पण भाजपवाल्यांना आपल्या नेत्यांचे ऐकावेसे वाटत नाही, महाराष्ट्र भाजपा आणि राष्ट्रीय भाजपाला देव वाचवेल वाचवा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com