Tesla Showroom Open In Mumbai Dainik Gomantak
महाराष्ट्र

Tesla Showroom In Mumbai: इलॉन मस्कच्या 'टेस्ला' कंपनीचं मुंबईत जय महाराष्ट्र! वांद्रे-कुर्ला संकुलात भारतातलं पहिलं शो रूम सुरू

Tesla Showroom Open In Mumbai: जगभरात नावाजलेली इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्लानं अखेर भारतात अधिकृतपणे प्रवेश केला आहे.

Sameer Amunekar

Tesla Showroom Launch In India

जगभरात नावाजलेली इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्लानं अखेर भारतात अधिकृतपणे प्रवेश केला आहे. मंगळवारी (15 जुलै) मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलात (BKC) टेस्लाच्या भारतातील पहिल्या शोरुमचं उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमात टेस्लाच्या वेगवेगळ्या मॉडेल्सची झलक कारप्रेमींना पाहायला मिळाली. शोरुममध्ये टेस्लाचे आकर्षक मॉडेल्स आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजनं सज्ज असलेली वाहनं कारप्रेमींना पाहता येणार आहेत.

उद्घाटनावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “टेस्लाने मुंबईतील त्यांचं पहिलं एक्सपीरियन्स सेंटर सुरू केलं आहे. भविष्यात लॉजिस्टिक सेंटर आणि सर्व्हिस सेंटरही मुंबईत सुरू होणार आहे. टेस्लाच्या कार्सचं बुकिंग आजपासूनच या सेंटरमधून सुरू होत आहे आणि मुंबईत टेस्ला कार्स विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत, ही शहरासाठी मोठी आनंदाची बाब आहे.”

टेस्लाने भारतात त्यांच्या Model Y या लोकप्रिय इलेक्ट्रिक एसयूव्ही कारने एंट्री केली आहे. या कारची ऑन-रोड किंमत 61 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर, रिअर-व्हील ड्राइव्ह व्हेरिएंटसाठी किंमत 59.89 लाख रुपये असल्याची माहिती रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिली आहे.

टेस्लाची ही भारतातील अधिकृत सुरुवात केवळ विक्रीपुरती मर्यादित राहणार नाही, तर भविष्यात उत्पादन आणि असेंब्लीसाठीही कंपनी भारतात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. मुख्यमंत्र्यांनीही टेस्लाला महाराष्ट्रात उत्पादन सुरु करण्याचे आवाहन यावेळी केलं.

टेस्लाच्या या एन्ट्रीनंतर भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात स्पर्धा अधिकच तीव्र होणार आहे. टाटा, महिंद्रा, एमजी मोटर्स आणि ह्युंदाईसारख्या कंपन्यांसाठी हा मोठा टप्पा ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 45 दिवसांत 10 अल्‍पवयीनांची अपहरणे, दक्षिण गोव्यात घर सोडून जाण्याचे प्रकार वाढले

Goa Tiger Reserve Controversy: केंद्रीय सक्षम समितीचा 'तो' अहवाल दबाव तंत्राखालीच! व्याघ्र क्षेत्राविषयी पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांचा दावा

Goa Temple Festival: शांतादुर्गा वेर्डेकरीण देवस्थानचा कालोत्सव, 28 पासून विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम

Gobi Manchurian Ban: डिचोलीत 'गोबी मंचूरियन'वरील बंदी ठरली यशस्वी, 'एफडीए'चा धसका

Goa Tourism: क्रूझ पर्यटन हंगामाला सुरुवात, पहिले जहाज दाखल; 2 हजार पर्यटकांनी घेतले गोवा दर्शन

SCROLL FOR NEXT