Terror Threat In Mumbai Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Terror Threat: मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी; NIAला मेल, सर्वत्र अलर्ट जारी

ई-मेल करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चा संबध तालिबानसोबत असल्याचे सांगितले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mumbai Terror Threat: मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. एनआयएला (National Investigation Agency) याबाबत धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर देशातील विविध शहरांना सतर्क करण्यात आले आहे.

एनआयएने मुंबई पोलिसांनाही ही माहिती दिली आहे. पोलीस आणि इतर यंत्रणा अलर्टवर असून, याचा अधिक तपास केला जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएच्या ईमेल आयडीवर धमकीचा मेल आला आहे, यात मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चा संबध तालिबानसोबत असल्याचे सांगितले आहे.

तसेच, तालिबान संघटनेचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानीच्या आदेशानुसार हे घडत असल्याचा दावा केला आहे.

धमकीच्या ईमेलची माहिती मिळताच मुंबई पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. सध्या पोलीस आणि इतर एजन्सी याबाबत तपास करत आहेत आणि ईमेल कोठून पाठवण्यात आला याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर देशातील विविध शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोण आहे सिराजुद्दीन हक्कानी

सिराजुद्दीन हक्कानी हा तालिबानचा सर्वात धोकादायक गट हक्कानी नेटवर्कचा प्रमुख आहे. अफगाणिस्तानात तालिबानच्या पुनरागमनानंतर त्यांना कार्यवाहक गृहमंत्री बनवण्यात आले आहे. यासोबतच तो तालिबानमधील नंबर दोनचा नेता आहे.

तालिबानमध्ये हक्कानी नेटवर्कचा मोठा प्रभाव आहे. अमेरिकन तपास संस्था एफबीआयने हक्कानीच्या ठिकाणाची माहिती देणाऱ्यावर दहा दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ठेवले आहे.

गेल्या महिन्यातही आली होती धमकी

यापूर्वी जानेवारी महिन्यात मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती.

1993 च्या धर्तीवर मुंबईत ठिकठिकाणी स्फोट घडवून दहशत माजवली जाईल, असे धमकी देणाऱ्या व्यक्तीने फोनवर सांगितले होते. 2 महिन्यांत हे हल्ले करू असे सांगण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT