Parambir Singh  Dainik Gomantak
महाराष्ट्र

परमबीर सिंग यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने दिली स्थगिती

सीबीआय न्यायालय (CBI Court) किंवा सीबीआयच्या कोणत्याही अधिकाऱ्यासमोर हजर राहण्यास तयार असल्याचे बाली यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

मुंबई: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांना फरार घोषित केले होते. त्यानंतर त्यांच्या अटकेपासून संरक्षण मिळावे या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) परमबीर सिंग यांना अटकेपासून वाचवताना, चालू तपासादरम्यान अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. सुनावणीदरम्यान परमबीर सिंग यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की केवळ देशातच आहे, पण त्यांच्या जीवाला धोका आहे.

गेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने त्यांच्या वकिलाला विचारले होते की, सिंह कुठे आहेत, आधी सांगा, मग कोर्ट ऐकेल. अशा स्थितीत सर्वसामान्यांचे काय होईल, असा प्रश्न आम्हाला पडतो, असे खंडपीठाने म्हटले आहे. नोटीस जारी करत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार आणि इतरांना 6 डिसेंबरपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 डिसेंबर रोजी होणार आहे.

परमबीरचे वकील पुनीत बाली यांनी न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या खंडपीठाला सांगितले की, परमबीर देशात आहे. मुंबई पोलिसांपासून तुम्हाला धोका कसा आहे, अशी विचारणा खंडपीठाने केली. परमबीर सिंग यांच्या वतीने वकील बाली यांनी न्यायालयात सांगितले की, माझ्याविरुद्ध सर्व एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. मी देशात आहे, पण माझ्या जीवाला धोका असल्याने मी लपून बसलो आहे. परबीर सिंग यांच्या वतीने वकील बाली यांनी सांगितले की, मी राज्याच्या गृहमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. अशा परिस्थितीत या प्रकरणाचा तपास CBI कडे पाठवावा.

बाली म्हणाले की, माझ्या अशिलाला DGP चे पत्र मागे घेण्यास आणि गृहमंत्र्यांच्या बाबतीत शांत राहण्यास सांगितले होते. फोनवर काय झाले याचा उतारा कुठे आहे, अशी विचारणा खंडपीठाने केली. बाली यांनी न्यायालयात उतारा सादर केला आहे.

बाली म्हणाले की, मला न्यायालयाला सांगायचे आहे की माझ्या अशिलाला कशाप्रकारे धमकी देण्यात आली आहे. त्याच्यावर एकामागून एक सहा एफआयआर नोंदवण्यात आले. तेही परमबीर सिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात ज्यांच्यावर कारवाई केली होती. हे प्रकरण सीबीआयकडे पाठवा, मी तातडीने हजर होईन, असे परमबीर सिंग यांच्या वतीने बाली म्हणाले. परमबीर सीबीआय न्यायालय किंवा सीबीआयच्या कोणत्याही अधिकाऱ्यासमोर हजर राहण्यास तयार असल्याचे बाली यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT