Summer Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबईत मार्चमध्येच 'लू' चा इशारा, जाणून घ्या

दैनिक गोमन्तक

थंडी संपून काही दिवस उलटले असतानाच देशातील अनेक राज्यांत उन्हाने आगपाखड सुरु केली आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मार्च महिन्यातच कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. पालघर, ठाणे, मुंबई (Mumbai), रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात 16 मार्चपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (Summer is intensifying in many districts of Maharashtra including Mumbai)

दुसरीकडे, बीएमसीने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि शरीरात पाण्याची कमतरता पडू नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर दुपारी बाहेर पडणे टाळण्याचे देखील आवाहन केले आहे. बीएमसीने म्हटले की, ‘’उष्माघाताने त्रस्त असलेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करावे. तसेच नागरिकांनी पाणी आणि इतर आरोग्यदायी द्रवपदार्थांचे सेवन वाढवावे.’’ भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवारसाठी 'ऑरेंज अलर्ट' (Intense heat wave conditions in some parts) आणि बुधवारी 'यलो अलर्ट' ( Loo position in isolated parts) जारी केला आहे.

तसेच, कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा सात अंशांनी वाढले असून पुढील काही दिवस तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या पुढे राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. हवामान बदल हा आता मुंबईकरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. समुद्रकिनाऱ्यालगत असलेले मुंबई शहर हवामान बदलाच्या दृष्टीने असुरक्षित मानले जाते. कडक उन्हामुळे पुराचा धोकाही वाढला आहे.

शिवाय, हवामानासंबंधी माहिती देणाऱ्या स्कायमेटचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी म्हटले की, चक्रीवादळ, अतिवृष्टी, भरती-ओहोटी, पाणी साचणे, वाढते तापमान, वायू प्रदूषण, अवकाळी पाऊस, कार्बन उत्सर्जन यांसारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी राज्य सरकारने मुंबईसाठी तयारी केली आहे. हवामान कृती आराखडा 2022 ही तयार करण्यात आला आहे. मुंबईतील वाढलेल्या तापमानाबद्दल डॉक्टरही लोकांना सतर्क करत आहेत. अशा उन्हात मास्क घालणे देखील मोठे आव्हान आहे.

बीएमसीने या सूचना दिल्या

बीएमसीने लोकांना दुपारी बाहेर पडताना पाणी घेऊन जाण्याची सूचना केली. तसेच पुरेसे आणि शक्य तितक्या वेळा पाणी प्या. तसेच लोकांना चहा, कॉफी, शीतपेये, उच्च प्रथिने आणि शिळे अन्न टाळण्याचे देखील बीएमसीने आवाहन केले आहे. एखाद्या व्यक्तीला उष्माघात झाल्यास त्याने सावलीत थंड जागी झोपावे, असेही बीएमसीने सुचवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT